MP Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांची बाॅडी घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या गाडीचा तो 'यू-टर्न'; खासदार सोनवणे यांच्या शंकेनं खळबळ

NCP SharadChandra Pawar Party MP Bajrang Sonwane police CID SID Beed Santosh Deshmukh murder case : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली शंका.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रमक पत्रकार परिषदेत सांगताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले.

"संतोष देशमुख यांचा मृतदेह पोलिसांनी वाहनातून आणताना ते वाहन दुसरीकडे घेऊन चालले होते. दुसरं वाहनं मागं दिसल्यानं पोलिसांनी त्यांचे वाहन केजच्या दिशेनं वळवलं. संतोष देशमुख यांचा मृतदेह नेमका कुठं घेऊन चालले होते, याचा खुलासा झाला पाहिजे. यात पोलिसांची कार्यपद्धती शंकास्पद वाटते", असा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेताना, संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगितला. या हत्येप्रकरणाच्या तपासात बीड पोलिस, सीआयडी आणि एसआयटी नेमकं काय काम करत आहे, याची उत्तर मिळत नाहीत. तपास योग्य दिशेनं चालला आहे की नाही, याची माहिती मिळत नसल्याने मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे संपूर्ण देशमुख कुटुंबिय भयभीत आहे. यातून धनंजय देशमुख यानं टाकीवर चढवून आत्महत्या करणार असल्याचा आंदोलन पुकारलं. पण आम्ही धनंजय देशमुख यांच्यावर ही वेळ येऊ देणार नाही. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत, देशमुख परिवाराबरोबर आहोत, असे बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

खासदार सोनवणे म्हणाले, "संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी काही घटना घडल्या होत्या, त्यात पोलिसांनी (Police) अ‍ॅक्शन घेतली, तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता. संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दुपारी साडेतीन वाजता अपहरण करून हत्या झाली. तत्पूर्वी धनंजय देशमुख यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथं धनंजय देशमुख पोलिसांना भावाचं अपहरण झाल्याचे सांगत होता. आरोपी विष्णू चाटे त्यावेळी 30 ते 32 फोन झाले. त्यानंतर पोलिसांना संतोष यांचा मृतदेह देहठणा सापडल्याचे कळाले". पोलिसानांच कसं कळालं की, मृतदेह तिथं आहे म्हणून, हा सुद्धा माझा संशय आहे. पोलिस यंत्रणेतील कोण सामील आहे, त्यांच्यात, असा सवाल खासदार सोनवणे यांनी केला.

संतोष देशमुख यांचा मृतदेह टाकून आरोपी तिथून पुढे गेले. त्या वाहनाचा पाठलाग करताना पोलिस निरीक्षक गेले. पण संतोष देशमुख यांचा मृतदेह आणताना, पोलिसांनी पोलिस ठाण्यात बसलेल्या लोकांना संतोष भेटल्याचे सांगितले. त्यावेळी बाॅडी बोलले नाही. पण पोलिसांनी ज्यावेळी बाॅडी वाहनात टाकली. देहठाणा आणि केज हाॅस्पिटल असा मार्ग असताना, तो चिचोळी माळी येथून बदलण्याचा प्रयत्न केला, यावर खासदार सोनवणे यांनी शंका घेत खळबळ उडवून दिली.

यानंतर पोलिसांचे वाहनाचा मार्ग, देहठणा फाट्यावरून कापरेवाडी- केवळ- चिंचोली माळीवरून केज होता, परंतु चिंचोली माळीवरून पोलिसांनी गाडी राईटला वळवली. ही गाडी राईटला का वळवली? याचे उत्तर गाडीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. जेव्हा कळालं की, आपल्या गाडीमागे आणखी एक गाडी आहे दुसरी, तेव्हा पोलिसांनी त्यांच्या गाडीचा 'यू-टर्न' घेऊन केजच्या हाॅस्पिटलला आणली. यावर पोलिसांवर संशय येतो की नाही, ते सांगा? पोलिसांनी वाहन कळमच्या दिशेनं का वळवलं, हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे, असाही घणाघात खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT