Guardian Minister : पालकमंत्री याच आठवड्यात जाहीर होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली तारीख

Guardian Minister Announcement Update : महायुती सरकारमधील पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या कधी होणार, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया.
BJP Chandrashekhar Bawankule
BJP Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुती सरकारची स्थापना आणि मंत्रिमंडळाचा विस्ताराला सुमारे एक महिना उलटून गेला असला, तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच आणि आपसात स्पर्धा सुरू आहे.

याच कारणामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. याच आठवड्यात पालकमंत्री जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "येत्या 15 ते 16 जानेवारीपर्यंत पालकमंत्रीपदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आमच्या आतापर्यंत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. कोणाला कुठल्या जिल्ह्यात नियुक्त करायचे याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे". त्यामुळे 26 जानेवारीला झेंडा वंदन कोणी करायचे हा प्रश्न सुटलेला असले, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

BJP Chandrashekhar Bawankule
Laxman Hake : 'तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको'; लक्ष्मण हाके आलेल्या धमकीवर म्हणाले...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप (BJP) तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल, त्यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरू. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसोबत जाऊन काम करू. भाजप नंबर एकच पक्ष आहे. असे असले, तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीत पुढे जाऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

BJP Chandrashekhar Bawankule
BJP Politics : CM फडणवीसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात युद्ध छेडलं अन् किरीट सोमय्या 'अ‍ॅक्शन मोड'वर...

इंडिया आघाडी अविचारी

इंडिया आघाडी अविचारी असल्यामुळे ती जास्त काळ टिकणार नाही. तसेही या आघाडीचे भविष्य संपले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीही संपल्यात जमा झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांना आपली ताकद अजमावून बघायची असल्याचे संजय राऊत यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

संजय राऊतांना टोला

संजय राऊत दिवसभर वटवट करीत असतात. ते पराभवाच्या मानसिकतेत आहे. अंधारात दिवा घेऊन फिरत आहे. आता त्यांचा वेळ संपला आहे. महाराष्ट्राची गद्दारी केली. पुढच्या काळात त्यांना भविष्य नाही. त्यांनी रोज टीव्हीसमोर येऊन तसेच सामानातून टीका करण्यापेक्षा आपला पक्ष वाढवावा, असा टोमणाही यावेळी बावनकुळे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com