Jayant Patil  Sarkarnama
मराठवाडा

Jayanat Patil News : अशोकराव, जीवनराव, सक्षणा व धैर्यशील यांचे एकमत झाले नाही तर... मीच उभारणार; जयंत पाटलांचा इच्छुकांना टोला

Political News : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : आगामी काळात होत असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यांच्या काही तक्रारी पक्षातील वरिष्ठ नेत्यापर्यंत येऊन पोचल्या आहेत. त्यामुळे या वेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इच्छुकांना मोलाचा सल्ला दिला.

स्पर्धा करू नका, एकसंघ रहा, प्रत्येकाला पुढे यायचे असते. त्यामुळे एकमेकांवर टीका टिपण्णी करीत असताना पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. याठिकाणी अशोक जगदाळे, जीवनराव गोरे, सक्षणा सलगर व धैर्यशील पाटील हे इच्छुक आहेत. या चार जणांत एकमत झाले नाही तर मीच तुळजापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करीत जयंत पाटील (Jayanat Patil) यांनी इच्छुकांना टोला लगावला.

पक्षातील प्रत्येकजण हा निष्ठावंत कार्यकर्ता असतो. त्यासाठी आपल्यात कुठलीच स्पर्धा न करता पक्ष उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी उभे रहा. पक्षात फूट पडली त्यावेळी पवार साहेबांना एकटे सोडून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्याच वेळी पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला होता. अनेक जणांनी सांगितले मात्र कधीच पवार साहेबांची साथ सोडण्याचा विचार मनात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात सर्व्हेच्या नावाखाली काही चॅनेलकडून फसवले जाईल. त्यामुळे प्रभावित करण्याचे कामही त्यांच्याकडून केले जाईल. त्यामुळे विचलित न होता एकसंघ राहून काम करा, अशा सुचना त्यांनी यावेळी केली. या सरकारच्या काळात पैसे घेतल्याशिवाय बदली होत नाही. त्यामुळे सरकारमध्ये सुरु असलेल्या गैरप्रकारामुळे जनतेत प्रचंड नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT