Jayant Patil News : जयंत पाटलांचे सूचक संकेत; 'अशोकभाऊंना तिकीट द्या म्हणणाऱ्यांना बाहेर कशाला काढता, आत बसवा!'

Poliitical news : जयंत पाटील मार्गदर्शन करीत असताना दोन युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचनेचीच सभास्थानी चर्चा जोरात रंगली होती.
Ashok Jagdale, jayant Patil
Ashok Jagdale, jayant Patil Sarakrnama
Published on
Updated on

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) 'शिवस्वराज्य यात्रे'ला धाराशिव जिल्ह्यात प्रतिसाद लाभत आहे. बुधवारी सकाळी परंड्यावरून तुळजापूर येथे यात्रेचे आगमन झाले. या यात्रेचे तुळजापूर मतदारसंघामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'शिवस्वराज्य यात्रे'प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह नेतेमंडळीनी हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील मार्गदर्शन करीत असताना दोन युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचनेचीच सभास्थानी चर्चा जोरात रंगली होती. (Jayant Patil News)

जयंत पाटील मार्गदर्शन करीत असताना दोन कार्यकर्ते उठून घोषणाबाजी करीत होते. त्यावेळी व्यासपीठावरून मार्गदर्शन करीत असलेल्या जयंत पाटील यांना त्यांच्या घोषणा ऐकू आल्या. त्यांनी त्या दोघांना शांत बसण्यास सांगितले. मात्र, ते घोषणा देतच होते. त्यामुळे काही जण त्या दोघांना सभागृहाबाहेर काढण्याच्या तयारीत होते. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले 'ते अशोकभाऊंना तिकीट द्या, असे म्हणत आहेत, त्यामुळे त्यांना बाहेर कशाला काढता, आत बसवा,' असे सांगत यांनी त्या कार्यकर्त्यांना धीर दिला.

जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या या सूचनेची सभास्थानी मोठी चर्चा रंगली होती. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार ठरविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Ashok Jagdale, jayant Patil
Congress Vs BJP : भाजपला मोठा झटका! बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

राज्य सरकारकडून विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. मात्र, त्यांना पुरेसा निधी उपलब्ध नाही. सरकारकडे अनेक प्रश्न मांडले आहेत त्यासाठी पैसे नाहीत. जाहिरात करण्यासाठी पैसे आहेत. पण, योजनेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. सरकार तुमच्या दारी या योजनेसाठी मोठया प्रमाणात पैसे दिले जात आहेत," असे जयंत पाटलांनी म्हटले.

Ashok Jagdale, jayant Patil
Hiraman Khoskar Politics: आमदार खोसकरांवर काँग्रेसची फुली, खोसकर जाणार अजित पवारांच्या पक्षात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com