Latur News : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाच व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. त्यानंतर कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. लातूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर छावा संघटनेने त्यांना माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन दिले. ते देत असतानाच तटकरे यांच्यासमोरच्या टेबलवर पत्तेही भिरकावले. यामुळे सतंप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. यावरून वाद निर्माण झाला आणि दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे 'निर्धार नवपर्वाचा' या पक्ष संवाद दौऱ्याच्या निमित्ताने लातूरमध्ये आले होते. यावेळी त्यांची शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यानंतर छावा संघटनेच्या शेतकरी आघाडीचे विजयकुमार घाडगे-पाटील यांनी तिथे येऊन तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळले. दरम्यान, तटकरे यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या निवेदनाचाही स्वीकार केला.
त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत छावा संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोकाटे हे संवेदनशील नाहीत. त्यांचा सरकारने तातडीने राजीनामा सरकारने घ्यावा. त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी मागणी केली. त्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते बाहेर पडले. ज्या कार्यकर्त्याने निवेदन देत पत्ते उधळले त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) युवा कार्यकर्त्यांनी त्या विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण सुरू केली. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत वेगवेगळ्या ठिकाणी पांगवले. या हाणामारीने काहीकाळ विश्रामगृह परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागण्यासाठी गेलो होतो. पत्ते खेळणारे कृषीमंत्री शेतकऱ्यांचं काय भलं करणार आहेत. याबाबत निवेदन दिलं त्यानंतर रेस्ट हाऊसच्या दुसऱ्या खोलीत बसलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुंड तिथे आले, त्यांनी आमच्यावर हल्ला केला. सत्तेचा माज काय असतो हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाले. अजितदादा छावात शेतकर्यांची पोरं आहेत, या गोष्टीचा हिशोब होणार, असा इशारा विजयकुमार घाडगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. आहे.
जे झाले, ते चुकीचेच!
कोकाटे यांच्याकडून जे झाले, ते चुकीचे आहे. चुकीच्या गोष्टींचे आम्ही कधीही समर्थन करीत नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी या विषयावर त्यांच्याशी संवाद साधणारच आहे. याआधीही कोकाटे यांनी काही वादग्रस्त विधाने केली होती. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वत: कोकाटे यांना समज दिली होती. समज हा शब्द कदाचित योग्य नसावा. पण, ते कोकाटे यांच्याशी बोलले होते. आता या प्रकरणातही आम्ही त्यांच्याशी बोलू. त्यांना कृषिमंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी शेतकर्यांचे हित जपले पाहिजे, असे तटकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.