Manikrao Kokate rummy video : कृषीमंत्र्यांची आठवी-नववी चूक; शेतकऱ्यांचा वारंवार आपमान, महायुती सरकारविरोधात बच्चू कडूंचा 'चक्काजाम'चा इशारा

Bachchu Kadu Slams BJP Over NCP Minister Manikrao Kokate Rummy Video : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर बच्चू कडू यांची भाजप महायुतीवर जोरदार टीका केली.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu criticizes BJP Mahayuti : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केल्याने एकच संतापाची लाट उसळली आहे.

माजी मंत्री बच्चू कडू यांनी या प्रकारावर भाजप महायुतीवर जोरदार 'प्रहार' केला आहे. शेतकऱ्यांची चेष्टा लावली असून, कृषीमंत्र्यांची ही नववी चूक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरूच राहिल, भाजप महायुतीविरोधात राज्यभरात 24 जुलैला 'चक्काजाम' करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

बच्चू कडू यांनी म्हटले की, "शेतकऱ्यांचं (Farmers) दुर्दैव आहे की, कृषीमंत्रीच सभागृहात रमी खेळत आहे. विधानसभेत कर्जमाफीच्या बाबतीत समिती तयार केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही, यासाठी समिती गठन करण्यात आली आहे. आणि आमचा कृषीमंत्री विधिमंडळात रमी खेळतोय. कृषीमंत्र्यांची आता ही आठवी-नववी चूक आहे यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?"

कृषीमंत्री माणिकराव कोकटे (Manikrao Kokate) यांनी पूर्वी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानांची आठवण बच्चू कडू यांनी करून दिली. 'इकडे शेतकऱ्यांना सांगताय की तुम्ही दारू पिता, लग्नात खर्च होतो, म्हणून तुमच्यावर कर्ज होते. आणि आमचे कृषिमंत्री रमीमध्ये जर गुंग आहे. असे असेल तर शेतकऱ्यांचं भलं काय होणार?', असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.

Manikrao Kokate
Thackeray BJP meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटी शिंदेंच्या शिवसेनेला झोंबतेय; सरनाईकांनी पळ काढणारे अन् संधीसाधू म्हणत डिवचले!

'इकडे कर्जबाजारीपणामुळे सर्व शेतकरी संकटात आला आहे. अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ सरळ कर्जमाफी करा, नंतर उपाययोजना करा', या मागणीचा पुनरुच्चार बच्चू कडू यांनी केला.

Manikrao Kokate
Ganesh Naik Navi Mumbai election : मंत्री नाईक नवी मुंबईत महायुतीला बाजूला सारणार? शिंदेंची शिवसेना 'टार्गेट'वर!

चक्काजामची तारीख ठरली

जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही, तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम होईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी यात्रा काढली होती. यात त्यांनी भाजप महायुतीच्या शेती धोरणांवर जोरदार टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com