Chhatrapati Sambhajinagar NIA Raid Sarkarnama
मराठवाडा

NIA News: छत्रपती संभाजीनगरात NIAची मोठी कारवाई; तीन युवक ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar NIA Raid: गेल्या महिन्यात NIA ने शहरात 9 ठिकाणी छापेमारी करून आयसीस या दहशतवादी संघटनेची संबंध असल्याच्या आरोपावरून शहरातील हर्सूल भागातील मोहम्मद झोयब खान नावाच्या वेब डिझायनरला अटक केली होती.

Mangesh Mahale

Chhatrapati Sambhajinagar News: बंगळूर येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने छत्रपती संभाजी नगरातील मयूरपार्क भागातील तीन तरुणांची कसून चौकशी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

रामेश्वरम कॅफे प्रकरणात (Rameswaram Cafe Blast Case) दोन मुख्य संशयतांच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरसूल परिसरात त्यांची कसून चौकशी केली. यामध्ये त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन लॅपटॉप, मोबाईलसह ते वापरत असलेले अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले.

संबधीत आरोपींची जवळपास आठ तास ही चौकशी सुरू होती. दरम्यान गेल्या महिन्यात NIA ने शहरात 9 ठिकाणी छापेमारी करून आयसीस या दहशतवादी संघटनेची संबंध असल्याच्या आरोपावरून शहरातील हर्सूल भागातील मोहम्मद झोयब खान नावाच्या वेब डिझायनरला अटक केली होती. त्याच्याकडून दहशतवादाशी संबंधित काही कागदपत्रे देखील जप्त केली होती.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने बेंगळुरुतील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले होते. मीडिया रिपोर्टनुसार, बल्लारीच्या कोल बाजारमधून शब्बीर नावाच्या एका व्यक्तीला चौकशीसाठी एनआयएने ताब्यात घेतलंय.

संशयिताला त्याच्या ट्रव्हल हिस्ट्रीवरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएला असा संशय आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक सक्रीय सदस्य या बॉम्बस्फोटाच्या कटाचा सूत्रधार आहे. संशयिताचे दहशतवादी संघटनांशी जवळचे संबंध आहेत. पीएफआयने अनेक लोकांचे ब्रेनवॉश केले आहे. त्यामध्ये आरोपीचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आले होते.

नेमकं काय घडलं होतं...

1 मार्च रोजी एक व्यक्ती रामेश्वरम कॅफेमध्ये आला होता. त्याने आपल्या जवळील एक बॅग कॅफेतच ठेवली. त्यानंतर तो कॅफेतून बाहेर पडला. त्यानंतर जवळपास एक तासाने कॅफेमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले होते. बेंगळुरुमधील रामेश्वरम कॅफे हा प्रसिद्ध आहे. कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली होती.

250 मतदान केंद्रे संवेदनशील

छत्रपती संभाजी नगर व जालना या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संभाव्य उमेदवारांसह सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे पोलिस विभागाने देखील आता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.

जिल्ह्यातील 250 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यापैकी शहरातील 3 मतदान केंद्रे हे अति संवेदनशील आहेत. पोलिसांनी यापूर्वी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला असून स्थानिक गुन्हेगार आणि गुन्हे दाखल असलेले नेते कार्यकर्ते यांची यादीच तयार केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT