Kolhapur Political News: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना वर्ग प्रशिक्षण व विशेष हाताळणी (EVM Training) प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला १९ हजार १४० मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ईव्हीएम यंत्र हाताळणे, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केंद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मतदानावेळी निवडणूक आयोगांच्या (Election Commission) सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली आहे.
चंदगड - १६७३
राधानगरी- २२०९
कागल - २२७०
कोल्हापूर दक्षिण - २००४
करवीर - १५७०
कोल्हापूर उत्तर- २९२७
शाहूवाडी - २०००
हातकणंगले- १४७४
इचलकरंजी- ११२३
शिरोळ- १८९०
'लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडा’, असे निर्देश कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिले आहे.
ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-१, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-२, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-३ यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ. खिलारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र, मतदान केंद्रांवर वापरावयाचे साहित्य, विविध नमुने, आदी संदर्भातील माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या आवश्यक सूचनांनुसार मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी, या संदर्भातील प्रशिक्षण उपस्थितांना देण्यात आले. या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
‘मतदारांनो स्वत:ला विकू नका...,’असे आवाहन ‘केआयटी’ कॉलेजच्या ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदारांना केले. लोकसभेचे मतदान सात मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी त्याचे महत्त्व विविध स्तरावरून स्वीपअंतर्गत सांगितले जात आहे.
निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार वापरावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यासारखे उपक्रम शहरातील विविध भागात राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यातील केआयटी कॉलेजच्या एनएसएसच्या मुलांमार्फत मतदारांना पथनाट्यातून मतदार जनजागृतीद्वारे माहिती देऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
पैसे घेऊन केलेल्या मतदानामुळे भविष्यात आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा तोटा जनतेला सहन करावा लागतो. त्यामुळे स्वत:ला विकू नका, अशा आशयाचा संदेश तरुण मतदार सर्व वयोगटांतील मतदारांना देत आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.