MLA Amit Deshmukh At Nilanga-Ashok Patil Nilangekar Absent News Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh News : नाराजी नाट्यानंतर अमित देशमुख निलंग्यात; नाईकवाडेंचा राग गेला, अशोक पाटील निलंगेकरांचा रुसवा कायम!

Nilanga Municipal Council Election : निलंगेकर गटाकडून सर्व 23 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता हे उमेदवार अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार? की मग माघार घेणार, हे 25 तारखेला स्पष्ट होणार आहे.

Jagdish Pansare

  1. निलंगा नगराध्यक्ष पदावरून सुरू झालेल्या नाराजी नाट्यावर अखेर अमित देशमुखांनी हस्तक्षेप करून नाईकवाडे व त्यांच्या समर्थकांची समजूत काढली.

  2. देशमुखांच्या मध्यस्थीनंतर बहुतेक तणाव निवळला असला तरी अशोक पाटील निलंगेकरांचा रुसवा मात्र कायम असल्याचे दिसून आले.

  3. यामुळे निलंग्याच्या स्थानिक राजकारणात अजूनही अंतर्गत अस्थिरता कायम राहू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राम काळगे

Nilanga Congress News : निलंगा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये घडलेल्या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यासाठी आज आमदार अमित देशमुख थेट निलंग्यात दाखल झाले. अजित नाईकवाडी व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अखेर देशमुखांनी नाराजी नाट्यावर पडदा टाकला. नाईकवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस मोठे यश मिळवेल असा दावा देशमुखांनी केल्यानंतर नाईकवाडे यांचा राग शांत झाल्याचे बोलले जाते. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांनी मात्र देशमुख यांच्या या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

निलंगा काँग्रेसमधील देशमुख आणि निलंगेकर यांच्यातील गटबाजी संपता संपत नसल्याचे चित्र आहे. अजित नाईकवाडे यांची उमेदवारी ऐनवेळी बदलल्यामुळे निलंगा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. नाईकवाडी समर्थकांनी दंड थोपटत कसे निवडून येतात तेच बघतो? अशी थेट धमकीच दिली होती. लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांनी नाईकवाडे व समर्थकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. अगदी अमित देशमुख यांनीही नाईकवाडे यांना फोन केल्याचे सांगितले जाते.

परंतु हे नाराजी नाट्य काँग्रेसला महागात पडू शकते यांची चाहूल लागताच अमित देशमुख आज स्वतः निलंगा येथे आले. अजित नाइकवाडे यांच्या घरी येऊन त्यांची नाराजी दूर करतानाच पक्षाच्या उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नगरपरिषदेच्या या महत्वाच्या निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर हे मात्र गायबच आहेत. खरंतर अमित देशमुख निलंग्यात येणार याची कल्पना त्यांना देण्यात आली होती. तरीही ते गैरहजर राहिले, यावरून काँग्रेसमधील अतंर्गत धुसफूस अद्याप पूर्णपणे थांबलेली नाही हे स्पष्ट होते.

निलंगा नगरपालिकेमध्ये सध्या देशमुख काँग्रेस व निलंगेकर काँग्रेस अशी गटबाजी उघडपणे पाहायला मिळते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही दिवसाचा अवधी असला तरी निलंगेकर गटाकडून सर्व 23 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता हे उमेदवार अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार? की मग माघार घेणार, हे 25 तारखेला स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून प्रबळ दावेदारी असलेले अजित नाईकवाडे यांना डावलून ऐनवेळी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांना उमेदवारी दिली.

अमित देशमुख यांना अशोक पाटील निलंगेकर यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता मी आलो याचा निरोप त्यांना मिळाला नसेल किंवा ते खाजगी कामानिमित्त बाहेर असतील, असे उत्तर देत त्यांना याविषयावर अधिक बोलणे टाळले. एकूणच अमित देशमुख यांनी नाराज कार्यकर्त्यांची नाराजी तर दूर केली, पण अशोक पाटील निलंगेकर यांना फारसे महत्व न देण्याची भूमिका ठेवल्याचे दिसून आले. अजित नाईकवाडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत असून विजयाचे शिल्पकार तेच असतील, असा दावा अमित देशमुख यांनी निलंग्यात केला.

FAQs

1. निलंगा नगराध्यक्ष पदावरून नेमका वाद कशामुळे निर्माण झाला?

नगराध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान गटबाजी आणि नाराजीमुळे तणाव निर्माण झाला होता.

2. अमित देशमुखांनी काय भूमिका बजावली?

त्यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करून नाईकवाडे व त्यांच्या समर्थकांची समजूत काढली आणि परिस्थिती शांत केली.

3. अशोक पाटील निलंगेकर का नाराज आहेत?

नगराध्यक्ष निवड प्रक्रियेत त्यांच्या गटाच्या काही मागण्या न मानल्याने ते अजूनही दुखावलेले आहेत.

4. हा वाद पूर्णपणे मिटला आहे का?

नाईकवाडे गट शांत झाला असला तरी निलंगेकरांच्या नाराजीमुळे वाद अंशतःच मिटल्याचे चित्र आहे.

5. याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?

गटबाजी कायम राहिल्यास आगामी निवडणुकांमध्ये अंतर्गत तणावाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT