Nilangekar V/S Nilangekar in Market Committee  Sarkarnama
मराठवाडा

Nilangekar V/S Nilangekar in Market Committee : बाजार समितीसाठी काका-पुतण्यात काॅंटे की टक्कर..

Bjp : विश्वास आणि विकासाची दृष्टी असलेले पॅनल हे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळे निवडणूकीत गुलाल आपलाच आहे.

सरकारनामा ब्युरो

Latur : जिल्ह्यातील निलंगा व औरादशहाजानी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (Nilangekar V/S Nilangekar in Market Committee) काका-पुतण्याच्या पॅनलमध्ये काॅंटे की टक्कर पहायला मिळणार आहे. काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर व भाजपचे आमदार संभाजीपाटील व त्यांचे बंधू अरविंद या पुतण्यांनी काकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजप-शिंदे गटाची युती झाल्यानंतर आज निलंगेकर बंधूकडून निवडणुक प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला.

यावेळी विरोधकांचे डिपाॅझीट जप्त करा, असे आवाहन करत अरविंद निलंगकेर यांनी काकांच्या पॅनलवर तोफ डागली. (Bjp) माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे खरे राजकीय वारस कोण? यावर नेहमीच जिल्ह्यात चर्चा होत असते. यावर एका पत्रकार परिषदेत अशोक पाटील निलंगेकर यांनी संभाजी पाटलांना (Sambhaji Patil Nilangekar) टोला लगावला होता. टोपी आणि जॅकट घालून कोणी राजकीय वारस ठरत नसतं, त्याला संभाजी पाटलांनी ते जनताच ठरवेल असे म्हणत पलटवार केला होता.

आता निलंगा आणि औरादशहाजानी बाजार समितीच्या निमित्ताने पुन्हा काका-पुतण्यांमधील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे अशी थेट लढत होत आहे. (Mahavikas Aghadi) भाजपाकडून प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली अरविंद पाटील निलंगेकर नवनिर्माण शेतकरी विकास पॅनल, तर काँग्रेसकडून त्यांचे काका अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी करून निवडणूक लढवली जात आहे.

भाजपा-सेना युतीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ माकणी ता. निलंगा येथे आज मारूतीरायाच्या चरणी नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवारांना विजयी करून विरोधकांचे डिपाॅझीट जप्त करा, असे आव्हान अरविंद निलंगकेर यांनी यावेळी केले. मतदार संपर्काच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून विरोधकांचे पॅनल कर्तव्यशुन्य, विकासशुन्य आहे.

विश्वास आणि विकासाची दृष्टी असलेले पॅनल हे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळे निवडणूकीत गुलाल आपलाच आहे. निलंगा-औराद शाहजानी येथील बाजार समितीच्या पॅनलमध्ये सर्व जाती-धर्माचे उमेदवार आहेत. शेतकरी, कष्टकरी वर्गातील उमेदवाराना आपण संधी दिली आहे. विरोधकाकडे विकासाचे मुद्दे नाहीत, त्यामुळे विरोधकांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील अरविंद निलंगेकर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT