Shiv Sena, BJP, Congress, NCP  sarkarnama
मराठवाडा

भाजपला मोठा दिलासा; नऊ जणांची उमेदवारी वाचली अन् सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं

लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीत पुन्हा रंगत वाढली आहे.

सरकारनामा ब्युरो

लातूर : लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या (Latur District Bank Election) निवडणुकीत पुन्हा रंगत वाढली आहे. काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी छाननीत अवैध ठरविलेल्‍या भाजपच्या नऊ उमेदवारांचे अर्ज विभागीय सहनिबंधकांनी वैध ठरविले आहेत. या निर्णयामुळे आता भाजपच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

निकालामुळे सत्‍ताधाऱ्यांना मोठी चपराक बसल्याची प्रतिक्रिया भाजपाचे (BJP) जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेश कराड यांनी दिली. जिल्‍हा बँकेच्‍या संचालक मंडळ निवडीसाठी येत्‍या 21 नोव्‍हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी यंदा सत्‍ताधाऱ्यांच्‍या विरोधात भाजपाने पॅनेल उभे केले आहे. सर्व जागांवर 35 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. निवडणुकीसाठी दाखल झालेल्‍या अर्जांची 20 ऑक्‍टोबर रोजी छाननी झाली. याछाननी मध्‍ये सत्‍ताधाऱ्यांकडून विरोधकांच्‍या सर्व उमेदवारीवर आक्षेप नोंदवण्‍यात आले होते.

निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी आक्षेपाच्‍या सुनावणीनंतर विरोधकांचे सर्व अर्ज अवैध ठरविले. त्यामुळे काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाची औपचारिकताच उरली होती. पण या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे अपिल करण्‍यात आले. या अपिलावर 28 ऑक्‍टोबर रोजी सुनावणी झाली. त्‍यात दोन्‍ही बाजूचे म्‍हणणे ऐकुन घेवून अवैध ठरविलेल्‍या विरोधी 9 जणांचे 10 उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

उमेदवारी अर्ज मंजूर केलेल्‍या उमेदवारांमध्‍ये भगवान रामचंद्र पाटील तळेगावकर (सोसायटी मतदार संघ देवणी), संतोष नागोराव सारंगे (सोसायटी मतदार संघ शिरूर अनंतपाळ), बाबु हणमंतराव खंदाडे (इतर मागासवर्ग मतदार संघ), ओमप्रकाश गिरीधर नंदगावे (भटक्‍या विमुक्‍त जाती मतदार संघ), सतिष रावसाहेब आंबेकर (मजूर फेडरेशन मतदार संघ), नवनाथ शिवराज डोंगरे (नागरी बँका मतदार संघ), सुरेखा रमाकांत मुरूडकर, अजंजी सुनिल कावळे, सय्यद इकबालबेगम ईस्‍माइल (महिला प्रतिनिधी मतदार संघ) आणि अंजली सुनिल कावळे (अनु. जाती मतदार संघ) यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT