Central Minister Nitin Gadkari
Central Minister Nitin Gadkari Sarkarnama
मराठवाडा

Nitin Gadkari : मराठवाड्यातील सगळे रस्ते २०२४ पर्यंत अमेरिकेच्या दर्जाचे बनवणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही वर्षात साडेचारशे किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग झाले, या शिवाय अनेक महत्वाचे प्रकल्प देखील सुरू आहेत, (Aurangabad) ज्यावर कोट्यावधी रुपये खर्च होणार आहेत. डबलडेकर पूल, मेट्रो, चार, सहापदरी रस्ते, केबल कार, हवेवर चालणारी कार, पाण्यात उतरणारे विमान, एअर कंडिशनर बसेस असे सगळे काही आपल्याला मराठवाड्यात (Marathwada) करायचे आहे. सगळ्या मंत्री व लोकप्रतिनिधींनी यासाठीचे प्रस्ताव तयार करून माझ्याकडे पाठवा या सर्वांना मी मंजुरी देईन, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

येत्या २०२४ पर्यंत मराठवाड्यातील सगळे रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांच्या दर्जाचे होणार आहेत, असे आश्वासन देखील गडकरी यांनी दिले. औरंगाबादेत धुळे-सोलापूर महामार्गासह विविध रस्त्यांचे व प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी अनेक नव्या महामार्गाची घोषणा देखील केली.

इथेनाॅलवर चालणाऱ्या दुचाकी-चारचाकी ते हवेत उडणणाऱ्या कार, आणि धरणात उतरणारे विमान अशा अनेक गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. गडकरी म्हणाले, जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा मी महाराष्ट्रातील सर्व श्रद्धास्थान असेल ठिकाणांना जोडणारे रस्ते करण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी अनेक रस्ते पुर्ण झाले आहेत, तर काही अंतिम टप्यात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे औरंगाबाद-पैठण रस्ता. संत एकनाथ महाराजांची भूमी असलेला हा रस्ता व्हायला थोडा उशीर झाला, पण आता तो देखील लवकरच पुर्ण होईल.

एवढेच नाही तर या जिल्ह्यात पुढच्या काळात २५ हजार कोटीचे रस्त्याचे काम सुरू करणार आहे. यात औरंगाबाद- पुणे या नवीन द्रुतगती महामार्गांचा देखील समावेश आहे. ज्यामुळे औरंगाबादहून पुण्याला १४० किलोमीटर प्रति तास वेगाने फक्त सव्वा तासात पुण्याला पोहचता येईल. याशिवाय औरंगाबाद शहरात लवकरच मेट्रो,आणि डबल डेकर योजनेवर ही काम चालू आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या की ते काम देखील गतीने सुरू होऊन औरंगाबादकरांच्या वाहतूकीचा प्रश्न सुटेल, असेही गडकरी म्हणाले.

शहरासाठी मेट्रोचा डीपीआर देखील तयार केला जात आहे, या प्रकल्पांमुळे औरंगाबादचे चित्रच बदलणार आहे. मराठवाडयात पाण्याची समस्या मोठी आहे ,मी पाण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर काम केले. पण गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये काही मुद्यांवर वाद आहे, दोन्ही राज्यातील नेत्यांनी पुढाकार घेऊन तो मिटवला तर पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल आणि तुमचे जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेले राहील, असा दावा देखील गडकरी यांनी केला.

मी पाण्यावर उतरणारे विमान ही कल्पना आणली, तुम्ही जर वॉटर प्लेन ही जर योजना राबवली तर पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मंत्री व लोकप्रतिनिधींना माझे आवाहन आहे, तुमच्या भागातले प्रस्ताव माझ्याकडे पाठवा मी त्याला मंजुरी देईल. भविष्यात शंभर टक्के इथनॉल वर चणाऱ्या गाड्या आम्ही आणत आहोत. अगदी कार ते दुचाकी या पुर्णपणे इथेनाॅलवर धावतील आणि ज्यामुळे जल आणि वायू प्रदूषण बंद होईल. याचा सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT