मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार नाहीत?

Cm Uddhav Thackeray|Pm Narendra Modi| Mumbai Visit| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला.
Cm Uddhav Thackeray|Pm  Narendra Modi|
Cm Uddhav Thackeray|Pm Narendra Modi|
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला. आज (24 एप्रिल) मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वाागताला मुख्यमंत्री जाणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. इतकेच नव्हे तर राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्या स्वागताला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याऐवजी उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जाणार आहेत. राज्यातील घडामोडी पाहता मोदी-ठाकरे यांच्यातील अंतर वाढल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.

Cm Uddhav Thackeray|Pm  Narendra Modi|
'माझाही मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न': सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्यापासून केंद्र आणि राज्यात संघर्षांची दरी वाढली आहे. त्यातच शिवसेनेने मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यात भाजप- शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया आणि दूसरीकडे भाजप नेत्यांना न्यायालयाकडून मिळणारे संरक्षण यावरुन शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर तर हा संघर्ष अजूनच तापला आहे. त्यामुळे आजच्या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com