Collector Sunil Chavan Sarkarnama
मराठवाडा

लस नाही, तर पर्यटन नाही; किमान एक डोस आवश्यकच

पर्यटन संबंधि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी अस्थापनांमध्ये (ट्रॅव्हल एजन्सी) कार्यरत (Collector Sunil Chavan Order Released)अधिकारी, कर्मचारी यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्याची खातरजमा करून त्यांच्याकडून तसे प्रमाणपत्र पहावे

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : संभाव्य तीसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने कोविड - १९ लसीकरण वाढणे गरजेचे आहे. सध्या राज्याच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा २६ व्या क्रमांकावर असून केवळ ५५ टक्के लसीकरण झाले आहे. यासाठी लसीकरण वाढवण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना व एस.टी. बसमधून प्रवास करणाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. `लस नाही तर प्रवेश नाही`, हा नियम मंगळवार (ता.नऊ) पासून जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मंगळवारपासून पुढील आदेशापर्यंत या नियमाची अंमलबजावणी सुरू राहील असे आदेशात म्हटले आहे. कोरोना महामारी रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

राज्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत ७४ टक्के लसीकरण झाले तर औरंगाबादमध्ये ५५ टक्के लसीकरण झालेले आहे. जिल्हा लसीकरणात मागे असल्याने संभाव्य तीसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभुमीवर लसीकरणाचा वेग वाढणे आवश्‍यक आहे. यामुळे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मंगळवारी (ता. नऊ) आदेश जारी केलेले आहेत.

यानुसार बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, पितळखोरा लेणी या ठिकाणी ज्यांनी कोविड - १९ चा किमान एक डोस घेतला असेल त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर पर्यटन संबंधि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी अस्थापनांमध्ये (ट्रॅव्हल एजन्सी) कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्याची खातरजमा करून त्यांच्याकडून तसे प्रमाणपत्र पहावे असे आदेशात म्हटले आहे.

काय आहेत आदेश ?

- पर्यटनस्थळे, छोटी- मोठी संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशा वर्दळच्या ठिकाणी किमान एक डोस घेतलेल्यांनाच प्रवेश द्यावा, ज्यांना एकही डोस नाही त्यांना प्रवेश मिळणार नाही.

- जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी यांनी लसीकरणाचे शंभर टक्के उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा.

- पर्यटनस्थळांजवळील सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, रिसॉर्ट, निवासव्यवस्था येथील कामगार, कर्मचारी व तेथे कार्यरत मनुष्यबळाचा लसीकरणाचा किमान एक डोस झाला पाहीजे. एक डोस झाला असेल तरच दुकान, हॉटेल, रिसॉर्ट उघडण्यास मुभा राहील.

- बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला आदी ठिकाणी संबंधित आरोग्य यंत्रणेने लसीकरण केंद्र सुरू करावे.

- मास्क वापरणे, दोन फुट अंतर, सॅनिटायझरचा वापर व आवश्‍यकतेनुसार फेसशिल्डचा वापर करावा.

- हर घर दस्तक व माझा वॉर्ड शतप्रतिशत लसीकरण वॉर्ड कार्यक्रमांतर्गत पहिल्या डोसनंतर विहित कालावधीपुर्ण झालेल्या नागरीकांना दुसऱ्या डोससाठी पाठपुरावा करावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT