ग्रामसेवक भडकले, आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

(Shivsena Mla Sanjay Shirsath Aurangabad) औरंगाबाद येथील सरपंच परिषद कार्यक्रमामध्ये आमदार संजय शिरसाट यांचा बोलतांना तोल सुटला. ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्च भाषा वापरून त्यांना हरामखोर, भामटे संबोधले.
Mla Sanjay Sirsath
Mla Sanjay SirsathSarkarnama
Published on
Updated on

नंदुरबार ः ग्रामसेवक हा सर्वात भामटा असतो असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातील ग्रामसवेकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ग्रामसेवकांबद्दल अपशब्द काढत अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नंदूरबार येथील ग्रामसेवक संघटनेने केली आहे.

यासाठी त्यांनी एक दिवसाचे आंदोलन देखील केले असून आमदारांवर गुन्हा दाखल झाला नाही, तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे काल झालेल्या महिला सरपंच परिषदेत आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ग्रामसवेक हा सर्वात भामटा असतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, काळजी घ्या, असे विधान शिरसाट यांनी केले होते.

त्यानंतर राज्यभरातील ग्रामसवेकांनी या विधानाचा निषेध करत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. औरंगाबादसह अनेक ठिकाणी शिरसाट यांच्या विरोधात ग्रामसवेकांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन करत माफी मागण्याचा आग्रह धरला होता. संजय शिरसाट यांनी मात्र आपण विधानावर ठाम आहोत, आपल्या मतदारसंघात अनेक ग्रामसेवकांचा वाईट अनुभव आला आहे.

माझे विधान हे सगळ्या ग्रामसेकांबद्दल नव्हते. जे चुकीचे वागतात त्यांनाच ते लागू पडते, चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सत्कार देखील केला जातो, असे म्हणत माफी मागण्याचा प्रश्न नसल्याचे प्रसार माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले होते.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला, यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी नंदुरबार मधील ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आली. औरंगाबाद येथील सरपंच परिषद कार्यक्रमामध्ये आमदार संजय शिरसाट यांचा बोलतांना तोल सुटला. ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्च भाषा वापरून त्यांना हरामखोर, भामटे संबोधले. ते महिला सरपंचाची फसवणूक करतात, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

Mla Sanjay Sirsath
महिला सरपंच परिषदेत ग्रामसेवकांचा `भामटा`, असा उद्धार; शिवसेना आमदार अडचणीत

या वक्तव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. तसेच अशा अपप्रवृत्तीचा बिमोड होणे गरजेचे आहे, त्यामुळे आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा एक दिवसीय आंदोलनाचे रुपांतर मोठ्या आंदोलनात होईल, असा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com