Sambhaji Nagar Dangal : Sarkarnama
मराठवाडा

Sambhaji Nagar: पोलीस आयुक्तांना बजावली नोटीस! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी का घेतला निर्णय?

Sambhaji Nagar : त्यानुसार महापालिकेचे प्रशासक तथा निवडणुक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी पवार यांना नोटीस बजावून 24 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

Jagdish Pansare

Sambhaji Nagar Election: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना शहरातील आकाशवाणी चौकातील बॅरिकेटस् हटवून चौक वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक तथा निवडणुक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी पवार यांना नोटीस बजावून 24 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

पालकमंत्र्यांच्या दबावामुळं हा चौक वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे जालना रोडवर नागरिकांना ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागत आहे. मृत्यूचा सापळा अशी ओळख असलेल्या जालना रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी अनेक दिवस अभ्यास करून अमरप्रीत चौक व आकाशवाणी चौक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या दोन्ही चौकात बॅरिकेटस् लावून वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे जालना रोड नागरिकांसाठी सुकर झाला होता. असे असताना ऐन महापालिका निवडणुकीत पोलिस आयुक्तांनी आकाशवाणी चौकातील वाहतूक खुली केली.

त्यानंतर काही तासांतच या चौकात तीन ते साडेतीन तास वाहतूक ठप्प झाली. दररोज नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान पोलिस आयुक्तांच्या या निर्णयाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात जी. श्रीकांत यांनी सांगितले की, यासंदर्भात रात्री उशिरा पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार पोलिस आयुक्तांकडून खुलासा मागविण्यात आला असून, 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. हा निर्णय राजकीय दबावापोटी घेण्यात आला का? कोणी दबाव टाकला? याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांपासून सुरू होती मागणी

आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती, त्यासाठी आंदोलने देखील करण्यात आली होती. मात्र वाहतूक कोंडीचे कारण देत पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली, पण ऐन महापालिका निवडणुकीत हा चौक वाहतुकीसाठी खुला का करण्यात आला? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT