सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाचा वेग आला असतानाच आता ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. हाके यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनीही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनाच इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी म्हटले आहे की मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही, मात्र देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी शनिवारी दिला आहे. यावर हाकेंनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
"घरात घुसून मारु," असे विधान जरांगे यांनी केले आहे, त्यावर लक्ष्मण हाके बोलत होते. 'तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायंच ते सांगा,'असे थेट आव्हान हाके यांनी जरांगे यांना दिले. "दोन समाजात अराजकता निर्माण होईल, असे विधान जरांगे यांनी करु नये," असा सल्ला त्यांनी जरांगेंना दिला.
"हा काळ दोनशे अडीचशे वर्षांपूर्वीचा नाही, माझी मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती आहे की अशी चिथावणीखोर विधान करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा, नाहीतर जातीय, सामाजिक तेढ निर्माण होईल, सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल, राज्यात अराजकता निर्माण होईल," असे हाके म्हणाले.
"जरांगे, घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही.तुमच्यात जर दम असेल ना, तर कधी, कुठे केव्हा ते सांगा. जातीय तेढ निर्माण का मिळणार आहे, तुम्हाला? असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला. आता काळ हा संविधान, न्यायव्यवस्थेचा आहे," असे हाके यांनी सांगितले.
मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी काल (शनिवारी) दिला. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांन हाके म्हणाले, "मुंडे यांनी रस्त्यावर फिरु न द्यायची भाषा करणारे जरांगे कोण आहेत. जरांगे गुंड आहेत, एसपी आहेत, जरांगे आहेत कोण? असा उलट प्रश्न हाकेंनी विचारला आहे. कायदा त्यांच्या मालकीचा आहे, असे हाके म्हणाले. अशा धमक्या त्यांनी देऊ नये, असे हाके म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.