
MP Gajanan Kirtikar Wife Passed Away : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर (वय ८२) यांचे निधन झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मेघना कीर्तिकर या आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज (रविवारी) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सांयकाळी अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत. संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
त्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) येथील शिवधाम स्मशानभूमी या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.