Dharashiv News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले. या फुटलेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर हे राहिले. त्यांनी रविवारी (ता.21) आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीला कलाटणी देणारा निर्णय जाहीर केला आहे. आता निर्णय जाहीर केल्यानंतर 24 तासांतच ओम राजेंनी थेट मंनाच फोन लावत पहिलीच मोठी मागणी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा अधिकृत प्रवेश केला आहे. एकीकडे ओम राजे यांनी मतदारसंघातील कामे रखडल्यामुळे आणि विकास निधी मिळण्यात अडथळे येत असल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा मोठा राजकीय निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
याचदरम्यान, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर 24 तासांच्या आतच अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाच फोन लावला. फोन लावून पाहिले काम केले, ओम राजेंनी एका अधिकाऱ्याच्या बदलीचे काम मार्गी लावण्यास सांगितलं आहे.सत्तेत दाखल होण्यानंतरचा ही पहिलीच मागणी त्यांनी केली.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करताच ओम राजेनिंबाळकर यांनी तात्काळ कामाला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. मतदारसंघातील जनतेसाठी 24 तास उपलब्ध, छोटे असो वा मोठे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता आणि सर्वांच्या सुख दु:खात सहभागी ही ओम राजेंची कार्यपद्धती राहिली आहे. तीच त्यांची वेगळी ओळख असून आमदारकी किंवा खासदारकीच्या दोन टर्ममध्येही त्यांनी जपल्याचं पाहायला मिळालं आहे. विरोधकांच्या टीकेला कोणतंही प्रत्युत्तर न देता आगामी काळात अनेक विकासकामे मार्गी लावून दाखवू असं ओम राजेनिंबाळकर यांनी म्हटलं आहे.
अणदूर येथील रहिवासी असलेले व धाराशिव जिल्हा रुग्णालयात काम करीत असलेले डॉ अविनाश शिवाजी गायकवाड यांच्या धाराशिव ते निलंगा येथील बदलीसाठी त्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांना फोन लावत हे पहिले काम असल्याचे सांगत करा असे म्हणाले, त्यावर आबिटकर यांनी करतो तुम्ही विनंती पत्र पाठवा. ओमराजे यांच्याकडे मंत्री आबिटकर यांचा फोन नंबर नव्हता, त्यांनी मंगेश चिवटे यांना फोन करून नंबर घेतला व नंतर मंत्री यांना फोन लावला. अणदूर येथुन आलेल्या संबंधित यांनी ओमराजे यांचे आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.