Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात 'जिगरी यार' म्हणून खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांची मैत्री ओळखली जात होती. हे दोन्ही नेते सुरुवातीला सार्वजनिक जीवनात व राजकीय प्रवासात नेहमी एकत्र असायचे, परंतु गेल्या महिनाभरातील राजकीय घडामोडींमुळे या दोन नेत्यांमधील पक्षीय अंतर वाढले आहे. ओम राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील राजकीय अंतर वाढले आहे. तरी वैयक्तिक मैत्री अजूनही कायम असल्याचे दोन्ही नेते सांगतात. त्यातच या दोन नेत्यांमधील मैत्रीविषयी शनिवारी प्रसार माध्यमाशी बोलताना ओम राजेनिंबाळकर यांनी मोठे विधान केले आहे.
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडत सहा खासदारानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा देखील समावेश होता. राजेनिंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडली तरी आमदार कैलास पाटील हे आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबाबत कायम आहेत. नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी आपण कधीही उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाही, असे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले असले तरी ओम राजेनिंबाळकर यांनी त्यांच्या मैत्रीबाबत मोठे विधान केले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी कैलास पाटील हे आपले मित्र आहेत आणि मैत्री ही मैत्रीच्या जागी कायम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे ‘ऑपरेशन टायगर’च्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ओम राजेनिंबाळकर यांनी बोलणे टाळले. पक्षांतराच्या बाबतीत कैलास पाटील यांना जो योग्य निर्णय वाटेल, तो त्यांनी घ्यावा, असे राजे निंबाळकर यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
आमदारांसाठीही ऑपरेशन टायगर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही यावर भाष्य केले आहे. तर, आमदार कैलास पाटील यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. या संदर्भातील राजकीय वादावर खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले, 'त्यांच्या राजकीय निर्णयावर मी त्यांना सल्ला देणार नाही. मात्र, ज्या लोकांसाठी आपण काम करतो, त्या लोकांच्याही आपल्याकडून अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करणे देखील गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.