Dharashiv Politics: 'कैलास पाटील 'ऑपरेशन टायगर 2' चा भाग..'; धाराशिवच्या पालकमंत्र्यांनीच दिले राजकीय भूकंपाचे संकेत

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राज्यात गेली कित्येक महिने चर्चा असलेलं 'ऑपरेशन टायगर' अखेर एकनाथ शिंदेंनी यशस्वी करुन दाखवलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यात धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची सर्वाधिक चर्चा झाली. आता पुन्हा त्याच धाराशिवमधून ऑपरेशन टायगर 2 ची चर्चा सुरू झाली आहे.
Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranikSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: राज्यात गेली कित्येक महिने चर्चा असलेलं 'ऑपरेशन टायगर' अखेर एकनाथ शिंदेंनी यशस्वी करुन दाखवलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यात धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची सर्वाधिक चर्चा झाली. आता पुन्हा त्याच धाराशिवमधून ऑपरेशन टायगर 2 ची चर्चा सुरू झाली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी(ता.14 ऑगस्ट) मोठं विधान केलं आहे. ते धाराशिव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी धाराशिव कळंबचे मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचं सांगत पुन्हा एकदा मराठवाड्यातील राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.

प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असून ते प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी असे आरोप करतात. पण आता कैलास पाटील यांच्यावर त्यांनीच आरोप केलेल्या 'त्या' सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ते कुठे जातात, घरी कधी जातात, तुळजापुरला कधी जातात याच्यावर नजर ठेवली जाणार असल्याचं टिप्पणी केली. तसेच याच माहितीच्या आधारे आम्ही ऑपरेशन टायगर 2 यशस्वी करु असा मिश्किल टोला सरनाईक यांनी लगावला आहे.

कैलास पाटलांचे यांनी तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसणाऱ्या चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा आरोप केला होता. पाटील यांच्या याच आरोपांना आता सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले. याच चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरुन सरनाईकांनी संदर्भ देत पुन्हा एकदा धाराशिवमधील नव्या राजकीय भूकंपाची वात पेटवली आहे.

Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
Shivsena News: एकनाथ शिंदेंची विदर्भात मोठी खेळी, दर्यापूर नगरपरिषदेचं राजकारणच फिरवलं; काँग्रेसचे तब्बल 19 नगरसेवक फोडले

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकरांनी जून 2026 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विकास, निधीचा अभाव आणि राजकीय अस्तित्वासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

तसेच ओम राजेनिंबाळकर यांनी आपण विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्याचं म्हटलं होतं. याचवेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाकडून अपेक्षित ताकद व जनसंपर्क मिळाला नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

Kailas patil, omraje nimbalkar, pratap saranik
Delhi Security Alert: देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच 'राजधानी'त खळबळ; हायकोर्टासह 6 ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी

मात्र, उद्धव ठाकरेंची साथ सोडताना ओम राजेनिंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला तरी, मातोश्रीवर टीका करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

मात्र,धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची मैत्री जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. त्यामुळे ओम राजेनिंबाळकर यांच्यानंतर कैलास पाटील यांच्याही पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यांनी ही चर्चा फेटाळून लावतानाच आपण ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com