<div class="paragraphs"><p>Omicron</p></div>

Omicron

 

Sarkarnama

मराठवाडा

नांदेड जिल्ह्यावर ओमीक्राॅनचे सावट; दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या तिघांना कोरोना

सरकारनामा ब्युरो

नांदेड ः जगभरात ओमीक्राॅन विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. देशात देखील याचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. आता जगात वेगाने वाढत असलेला ओमीक्राॅन (Omicron) विषाणू मराठवाड्याच्या (Marathwada) दारात आला आहे का? असा प्रश्न पडला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात विदेशातून आलेल्या तीनशे दोन रुग्णांची आरोग्य विभागाने कोरोना चाचणी केली. यातील तिघांचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे हे तिघेही दक्षिण अफ्रिकेतून आले असल्याचे समोर आले आहे.

हिमायतनगर येथील हे तीघेही कोरोना पाॅझीटीव्ह आले असून आता या सर्वाचे नमुने जिनोमिक सीक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार आहे. या अहवालानंतरच या तिघांना ओमीक्राॅनचा संसर्ग झाला आहे की नाही? हे स्पष्ट होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत नांदेड जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या तीनशेच्या वर गेली होती.

ओमीक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने या सर्वांना विलगीकरणात ठेवले होते. या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पैकी तिघांचा अहवाल पाॅझीटीव्ह आला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमायतनगर येथील हे तिघेजण काही दिवसांपुर्वीच दक्षिण अफ्रिकेतून आल्याची माहिती आहे.

त्यामळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यात ओमीक्रॉनचे सध्या ५४ रुग्ण असून हायरिस्क असलेल्या देशातून आलेल्या विमान प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची चाचणी करण्यात येत असून आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचेही टोपे यांनी नुकतेच स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT