नगर पंचायतींच्या मतदानाची आकडेमोड; कोणत्या मुंडेंच्या खात्यात किती जागा?

प्रचारात देवस्थान जमिन घोटाळा, ईडीच्या चौकशा, जेलची हवा, दहशत अशा मुद्द्यांवर प्रचाराची राळ उठली आणि मंगळवारी मतदानही झाले. (Dhnanjay -Pankaja Munde)
Dhnanjay Munde-Pankaja Munde

Dhnanjay Munde-Pankaja Munde

Sarkarnama

Published on
Updated on

बीड : जिल्ह्यातील पाच नगर पंचायत निवडणुकींपैकी खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) व माजी पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मतदार संघात एकही निवडणुक नव्हती. पण, राज्य पातळीवर नावे असल्याने आता निकालाच्या यश - अपयशांचे श्रेय मात्र या दोघांच्याच खात्यावर पडणार आहे. (Beed) त्यामुळे कोणाच्या खात्यावर किती विजयांची नोंद होणार याची आकडेमोड सुरु झाली आहे.

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, वडवणी आणि केज या नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या. निवडणुका झालेले मतदार संघ हे आष्टी, माजलगाव आणि केज आहेत. वास्तविक पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मतदार संघ परळी आहे. त्यांच्या मतदार संघातील एकही नगर पंचायतींची निवडणुक झालेली नाही.

या निवडणुकांच्या यश - अपयशाचे परिणाम जरी त्या - त्या मतदार संघातील आजी - माजी आमदारांवर होणार असले तरी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची ओळख राज्यपातळीवर असल्याने यशापयशाचा लेखाजोखा या नेत्यांच्या खात्यावरही मांडला जाणार आहे. आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या नगरपंचायती सद्यघडीला भाजप आमदार सुरेश धस यांच्या अधिपत्याखाली होत्या.

झालेल्या निवडणुकीत भाजपकडून धसांनी नेतृत्व केले तर माजी आमदार भिमराव धोंडे यांनी त्यांना मदत केली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे व शिरुर हे राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबबु शेख यांचे गाव असल्याने या दोघांनी ताकद लावली होती. वडवणीची नगर पंचायत भाजपचे नेते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्या अधिपत्याखाली होती. सत्ता राखण्यासाठी त्यांनी ताकद लावली.

शेवटच्या टप्प्यात रमेश आडसकरही त्यांच्या मदतीला उतरले. तर, सत्तांतरासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आमदार प्रकाश सोळंके यांनी पूर्ण ताकद व प्रतिष्ठा पणाला लावली होती. केज नगर पंचायतीवर काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचे वर्चस्व आहे. सत्ता राखण्यासाठी त्यांनीही जोर लावला.

तर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचेही केज होमपिच आहे. त्यांनीही सत्तांतरासाठी या ठिकाणी चांगलीच ताकद लावली आहे. मतदार संघाचे प्रतिनिधित्व भाजप आमदार नमिता मुंदडा करत असल्या तरी निवडणुकीत कमळ नव्हते. भाजप नेते रमेश आडसकर यांनी मात्र स्थानिक आघाडीला बळ दिले आहे.

<div class="paragraphs"><p>Dhnanjay Munde-Pankaja Munde</p></div>
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी

याच आघाडीत एक मुंदडा समर्थकही उभे हेाते. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही केज व शिरुर कासारमध्ये शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरविले आहे. या सर्व नगर पंचायतींमध्ये सत्ता राखण्यासाठी आणि सत्तांतरासाठी स्थानिक नेते, आमदारांनी साम - दाम अशी ताकद व प्रतिष्ठा पणाला लावली.

प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके आदींसह स्थानिक नेत्यांनी सभांचा धडाका लावला. तर, भाजपकडून पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या सभा झाल्या.

प्रचारात देवस्थान जमिन घोटाळा, ईडीच्या चौकशा, जेलची हवा, दहशत अशा मुद्द्यांवर प्रचाराची राळ उठली आणि मंगळवारी मतदानही झाले. मात्र, आता निकालासाठी महिनाभराची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे निकालात कोणती नगर पंचायत कोणाकडे येणार याचे अंदाज बांधणे सुरु आहे.

भविष्यात निकालाचे चांगले - वाईट परिणाम स्थानिक नेत्यांनाच्याच नफ्या - तोट्याचे आहेत. मात्र, राज्य पातळीवर चर्चा होताना मात्र जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी किती नगर पंचायती जिंकल्या व पंकजा मुंडे यांनी किती नगर पंचायती जिंकल्या याचे विश्लेषण होणार आहे. त्यामुळे आता या दोघांच्या राजकीय खाते पुस्तकात जय - पराजयाचे किती आकडे पडतात हे पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com