Omraje Nimbalkar News Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar news : मशालीवर मत मिळेना म्हणणारे खासदार ओमराजे तोंडघशी; ZP, नगरपालिका, पंचायत समितीत ठाकरेंचे शिलेदार लढवतायेत किल्ला... हा घ्या पुरावा....

Shiv Sena UBT Crisis, Uddhav Thackeray News : उमरगा नगरपालिकेत ओमराजे निंबाळकर यांच्या दाव्यानूसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. इथे 25 पैकी 12 जागा या शिंदेंच्या शिवसेनेला, सहा काँग्रेस, पाच भाजपा तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यात गेल्या आहेत.

Jagdish Pansare

Dharashiv Politics News : विरोधी पक्षाचा खासदार असल्यामुळे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निधी मिळत नाही, विकासकामे करता येत नसतील तर काय करायचे? असा त्रागा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. 14 कोटी खासदार निधी मिळाल्यानंतर त्यातील पंचवीस टक्केच खर्च केल्याचे समोर आल्यानंतर ओमराजे यांचा मशाल चिन्हावर मतं मिळत नाहीत, झेडपी-नगरपालिका, पंचायत समितीत आमचा एकही उमेदवार निवडून आला नाही, हा केलेला दावा देखील खोटा निघाला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील काही तालुके वगळता जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये पक्षफुटीनंतरही समाधानकारक सदस्य ठाकरेंच्या पक्षाचे निवडून आले आहेत. या पक्षाच्या सदस्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ओमराजे निंबाळकर यांचा मशाल चिन्हावर मतं मिळत नाहीत, हा दावा किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते. नुकत्याच झालेल्या धाराशिव जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलावर नजर टाकली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सात सदस्य निवडून आलेले आहेत.

एकूण 55 सदस्य संख्या असलेल्या धाराशिव झेडपीमध्ये भाजपा सर्वाधिक 19 जागांसह मोठा पक्ष ठरला. तर शिंदेंच्या शिवसेनेचे 15 सदस्य निवडून आले आहेत. तर 7 सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-6, अपक्ष-4, काँग्रेस-3, समाजवादी पक्ष 1 असे प्रमाण आहे. धाराशीव जिल्ह्यातील नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता किंवा त्याच्या जवळपास जाण्या इतके सदस्य, नगरसेवक निवडून आले नसले तरी त्यांची संख्या अगदीच निराशाजनक निश्चितच नाही. काही तालुक्यात पक्षाची पाटी कोरी असली तरी ओमराजे यांनी केलेल्या दाव्याला बळ मिळेल, अशी परिस्थिती अजिबात नाही.

धाराशिव जिल्ह्यातील भूम नगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एका जागेने खाते उघडले आहे. वीस जागा असलेल्या या नगरपालिकेत शिवसेना-6, भाजप-2, आणि इतर अकरा असे चित्र आहे. धाराशिव-कळंब या विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या कळंब नगरपालिकेत 9 जागांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. 20 सदस्य संख्या असलेल्या या नगरपालिकेत भाजपा 6, शिंदेंची शिवसेना-4 तर काँग्रेस 1 असे बलाबल आहे. कळंबमध्ये आमदार कैलास पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याने इथे ठाकरेंच्या पक्षाची सरशी झाली आहे.

उमरगा नगरपालिकेत ओमराजे निंबाळकर यांच्या दाव्यानूसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. इथे 25 पैकी 12 जागा या शिंदेंच्या शिवसेनेला, सहा काँग्रेस, पाच भाजपा तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यात गेल्या आहेत. तर धाराशीव नगरपालिकेत 41 पैकी 22 जागा जिंकत भाजपाने सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 सदस्य इथे निवडून आलेले असून हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सात नगरसेवकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला तीन तर एमआयएमला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

पंचायत समितीमध्येही मशाल पेटली...

जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी हाती आलेल्या सहामधील चित्रानूसार भूम, वाशी, लोहारा या तीन पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. तर धाराशीव, उमरगा आणि कळंब पंचायत समितीमध्ये अनुक्रमे 7,1,8 असे सदस्य निवडून आलेले आहेत. ही आकडेवारी अगदीच निराशाजनक नाही. ज्या ओमराजे निंबाळकर यांना धाराशीव लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले, त्या मतदारसंघात मशाल चिन्हावर मतंच मिळत नाहीत, हा पक्ष सोडल्यानंतर त्यांनी केलेला दावा खोटा ठरतो आहे.

असे आहे चित्र..

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय बलाबल

धाराशिव जिल्हा परिषद

भाजप - 19

शिवसेना - 15

शिवसेना युबीटी - 07

समाजवादी पक्ष - 01

राष्ट्रवादी काँग्रेस - 06

अपक्ष - 04

काँग्रेस - 03

एकूण - 55

धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिकांमधील चित्र

भूम - एकूण जागा 20

शिवसेना - 6

भाजप- 2

शिवसेना युबीटी - 1

इतर - 11

कळंब- एकूण जागा 20

भाजाप-6

शिवसेना- 4

शिवसेना युबीटी - 9

काँग्रसे- 1

उमरगा- एकूण जागा 25

शिवसेना- 12

काँग्रेस- 6

भाजप- 5

राष्ट्रवादी-2

धाराशिव- एकूण जागा 41

भाजप-22

शिवसेना युबीटी-07

काँग्रेस-03

राष्ट्रवादी एसपी - 8

एमआयएम- 1

धाराशिव - पंचायत समित्यांतील स्थिती

भूम- एकूण जागा 10

शिवसेना-5

राष्ट्रवादी काँग्रेस-4

वंचित-1

वाशी - एकूण जागा 6

शिवसेना- 5

राष्ट्रवादी-1

लोहारा - एकूण जागा 8

भाजप - 3

शिवसेना - ४

राष्ट्रवादी - 1

कळंब - एकूण जागा 16

शिवसेना युबीटी - 8

शिवसेना - 3

भाजप - 5

उमरगा - एकूण जागा 18

शिवसेना - 5

भाजप - 7

राष्ट्रवादी - 1

शिवसेना युबीटी - 1

काँग्रेस - 3

अपक्ष - 1

धाराशिव - एकूण जागा 24

भाजप - 13

शिवसेना युबीटी - 07

शिवसेना - 2

रासप - 1

अपक्ष - 1

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT