OmRaje Nimbalkar | Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad Assembly constituency: उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, महायुती सरकारने सोयाबीनचा भाव घसरवला

Omprakash Raje Nimbalkar: एकीकडे महायुती सरकार दरमहा दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना सहकार्य करण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात सात हजार रुपयांचे नुकसान करत आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Constituency 2024 : महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावेळी सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. याहीवेळी सत्ता आल्यास शेतकरी कर्जमुक्त करणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मोठ्या मतांनी आपले उमेदवार निवडून द्या, असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील पळसप येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनाचा योग्य दर मिळत होता. (Omraje Nimbalkar) त्यावेळी सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल 11 हजार रुपये होता, मात्र सध्याच्या महायुती सरकारच्या कारभारामुळे तो दर आता प्रतिक्विंटल फक्त चार ते साडेचार हजार रुपयांवर घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.

एकीकडे महायुती सरकार दरमहा दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना सहकार्य करण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात सात हजार रुपयांचे नुकसान करत आहे. हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा फटका देणारे आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनाचा योग्य दर मिळत होता. त्यावेळी सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल 11 हजार रुपये होता, मात्र सध्याच्या महायुती सरकारच्या कारभारामुळे तो दर आता प्रतिक्विंटल फक्त चार ते साडेचार हजार रुपयांवर घसरला आहे. (Kailas Patil) यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.

एकीकडे महायुती सरकार दरमहा दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना सहकार्य करण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात सात हजार रुपयांचे नुकसान करत आहे. हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा फटका देणारे आहे.

आज नोकऱ्यांच्या अभावामुळे धाराशिव, कळंब तालुक्यातील तरुण पुणे आणि मुंबईकडे रोजगारासाठी स्थलांतरित होत आहेत. केवळ रोजगाराच्या संधीअभावी हे स्थलातंर होत आहे. राज्यात मोठ्या संधी आणण्याची महायुती सरकारची असमर्थता यामुळे दिसून येते. पुण्यात येऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे दोन लाख लोकांचा रोजगार बुडाला.

हे फक्त महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाले आहे. या सभेत शेतकरी, बेरोजगार युवक, गरीब आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्‍नांवर खासदार राजेनिंबाळकर यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल करत विविध मुद्यांवरून घणाघाती टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT