Dharashiv-Kalamb Assembly Constituency 2024 : शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले सरकार हटवा, आम्ही तुमचे जीवनमान उंचावू!

Kailas Patil says, we will implement schemes that will improve the standard of living of farmers : महायुती सरकारने केलेली वचनबद्धता फोल ठरली आहे. शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या समस्येत अडकवले आहे. हमीभावाच्या नावाखाली शेतमालाची विक्री ठप्प झाली आहे. आणि पिकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.
Kailas Patil
Kailas Patil Srakarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : यंदाची निवडणुक महत्वची आणि महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले महायुतीचे सरकार हटवण्यासाठी प्रत्येकांने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन धाराशीव-कळंब मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांनी केले.

पहिल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. परंतु, त्यातील दोन वर्षे कोविडच्या संकटात गेली. (Kailas Patil) त्यामुळे आम्हाला फक्त सहा महिनेच काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्या कालावधीत देखील आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर सत्तेवर आलेले महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेवून केवळ राजकीय फायद्यासाठी धोरणे आखली आहेत.

महायुती सरकारने केलेली वचनबद्धता फोल ठरली आहे. शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या समस्येत अडकवले आहे. हमीभावाच्या नावाखाली शेतमालाची विक्री ठप्प झाली आहे. आणि पिकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, असा आरोप कैलास पाटील यांनी आपल्या भाषणात केला. या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फसव्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

Kailas Patil
MLA Kailas Patil News : शक्तीपीठ मार्ग रद्द करा; तो निधी मराठवाड्याच्या पाण्यासाठी द्या..

सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना आधार मिळाला नाही. (Dharashiv) महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेची संधी दिल्यास, आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करू, पिकविमा योजना पुन्हा सक्षमपणे राबवू, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

शेतमालाला चांगला दर मिळवून देऊ आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढू. वाठवडा गावातील समस्यांवर विशेष लक्ष देत शेतकऱ्यांना हक्काचे जीवनमान उभे करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com