MP Omprakash Rajenimbalkar  Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar : माझा कार्यकर्ता असता तर त्याचवेळी हातोडा मारला असता; खासदार ओमराजेंचा रोख कोणाकडे?

Tuljapur Drugs Case : या प्रकरणामध्ये जे-जे कोणी अडकलेत त्यांना वाचवण्यासाठी कोणाचे अभय आहे, हे शोधणे गरजेचे आहे, या प्रकरणातील आरोपी हा कोणत्या पक्षाचा व कुणाचा कार्यकर्ता तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणातील दोषी माझ्या कितीही जवळचा असला तरी या प्रकरणात त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, या मताचा मी आहे. या प्रकरणामध्ये जे-जे कोणी अडकलेत त्यांना वाचवण्यासाठी कोणाचे अभय आहे, हे शोधणे गरजेचे आहे, या प्रकरणातील आरोपी हा कोणत्या पक्षाचा व कुणाचा कार्यकर्ता तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातील 21 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे ही पोलिसांपुढाचे आव्हान असणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले आहे. अद्याप काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणावरून भाजप (BJP ) व शिवसेना ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना खासदार ओमराजे यांनी मोठे वक्तव्य करीत केले असून आरोपी कोणी का असेना ? त्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी केली आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला वर्षभरापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी याबाबत माहिती मिळूनही कारवाई झाली नाही. माझा कार्यकर्ता असता तर मी पाठीशी घातले नसते, वर्षभरापूर्वीच हातोडा मारला असता. या प्रकरणातील आरोपी हा कोणत्या पक्षाचा व कुणाचा कार्यकर्ता आहे हे तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.

माझ्या पक्षाचा अथवा माझ्या जवळचा कार्यकर्ता असता तर त्याचवेळी पोलिसांच्या स्वाधीन केले असते असेही त्यांनी स्पष्ट केले. जो पर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपी जेलमध्ये जात नाहीत, तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलय.

या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून व भाजपकडून एकमेकांवर आरोप केले जात असताना आता या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपीचे व भाजपच्या नेत्याचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व आरोपीना कधी अटक केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT