Mp.Omraje Nimbalkar News, Osmanabad
Mp.Omraje Nimbalkar News, Osmanabad Sarkarnama
मराठवाडा

MP Omraje Nimbalkar News : अगडबंब अधिकाऱ्यांना पाहून ओमराजे म्हणाले, योगा, व्यायाम करा, अन्यथा राजीनामे द्या..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : वाढलेल्या ढेऱ्या, डायबीटीज, शुगरच्या तक्रारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना योगा, व्यायाम करा, असा सल्ला खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांनी एका बैठकीत दिला. जर जमत नसेल तर राजीनामे द्या, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. पोकरा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत समोर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून ओमराजे चांगलेच संतापले.

बीपी, शुगरवाल्यांनो जरा व्यायाम योगा करत जा, असा सल्ला देतांनाच जमत नसेल तर राजीनामा द्या, हे सांगायला देखील ते विसरले नाही. (Osmanabad) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत विविध योजनेचा आढावा खासदार ओमप्रकाश निंबाळकर, (MP Omraje Nimbalkar) आमदार कैलास पाटील यांनी घेतला.

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील कृषी पर्यवेक्षक सगर यांचे नुकतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांना देण्यात आली. (Marathwada) याबद्दल दुःख व्यक्त करतांनाच त्यांनी उपस्थिती अधिकाऱ्यांनो आपली तब्यत सांभाळा. नियमित योगा, व्यायाम करा, असा सल्ला दिला.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची सर्व प्रकरणे ७ दिवसाच्या आत निकाली काढा, अशा सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याचे खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT