Vandhit Bahujan Aghadi Sarkarnama
मराठवाडा

Vanchit Bahujan Aghadi Camp News : निमित्त शिबीराचे, पण औरंगजेब कबर, भद्रा मारोतीला भेट देत आंबेडकरांनी उडवला धुराळा..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा कालचा खुलताबाद दौरा चांगलाच गाजला. आधी औरंगजेबाच्या कबरीला भेट फुले उधळली अन् त्यानंतर भद्रा मारोतीचे दर्शन घेत (ते याला भेट म्हणतात) आबंडेकरांनी खळबळ उडवून दिली. (Vanchit Bahujan Aghadi Camp News) प्रकाश आंबेडकर हे दोन दिवसांपासून शहरात आहेत. खुलताबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरातील साडेतीन हजारांहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराच्या निमित्ताने आंबेडकरांनी राज्याच्या राजकारणात मात्र चांगलाच धुराळा उडवून दिला आहे.

या शिबिरानिमित्तच त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारोती मंदिराला भेट दिली. आगमी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vanchit Bahujan Aghadi) वंचितने हे शिबीर आयोजित केल्याचे सांगितले जाते. (Prakash Ambedkar) विशेष म्हणजे काही वर्षांपुर्वी एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी यांनी देखील खुलताबदेच राज्यभरातील मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

आता वंचितने देखील दोन दिवसीय शिबीरासाठी खुलताबद हेच ठिकाण निवडले हा निव्वळ योगायोग आहे, की यामागे काही विचार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. वंचितने उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाशी युती केलेली आहे. (Aurangabad) गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआएमसोबत युती केल्यानंतर याचा फायदा वंचितला कमी आणि एमआयएमलाच अधिक झाला होता.

सोलापूर आणि अकोला या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाल्यानंतर ही युती वर्षपुर्ती आधीच तुटली. दलितांनी मुस्लिम उमेदवारांना भरभरून मते दिली, पण मुस्लिमांची मते वंचितला मिळाली नाही, असा आरोप केला जातो. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

मुंबई महापालिकेत एन्ट्री मिळावी हा वंचितचा पहिला हेतू असल्याचे बोलले जाते. मुंबई महापालिकेतील यशापयशावर लोकसभा आणि मग विधानसभेला ठाकरेंसोबत जायचे की नाही? याबद्दल विचार केला जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन दिवसीय शिबीरात प्रकाश आंबेडकर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT