Ashok Chavan News, Maharashtra Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्षानिमित्त मराठवाड्यातील ७५ प्रश्न मार्गी लावा..

Marathwada : हैद्राबाद मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आणि सर्वसामान्य जनतेने प्रचंड अत्याचार व दडपशाही सहन केली.

सरकारनामा ब्युरो

Monsoon Session : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावून या विभागाचे महत्वाचे ७५ प्रश्न निश्चित करावे आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. (Ashok Chavan News) मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने मांडलेल्या अभिवादन प्रस्तावावर बोलतांना त्यांनी वरील मागणी केली.

चव्हाण म्हणाले, अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या विभागाचे प्रमुख ७५ प्रश्न मार्गी लावण्यास राज्य सरकारने पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने हे ऐतिहासिक वर्ष स्मरणात राहिल. (Ashok Chavan) थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे नांदेड येथील स्मारक पूर्ण करावे तसेच मुक्तिसंग्रामाचा इतिहास जनतेला ज्ञात व्हावा, यासाठी एका माहितीपटाची निर्मिती करावी, (Marathawada) अशी मागणी त्यांनी केली.

मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील स्थगितीचे निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे. (Monsoon Session) हा लढा भारतीय स्वातंत्र्य चळवळीइतकाच महत्त्वाचा आहे. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आणि सर्वसामान्य जनतेने प्रचंड अत्याचार व दडपशाही सहन केली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाप्रमाणे मुक्तिसंग्रामातही गावागावातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा न करता स्वयंस्फुर्तीने हे आंदोलन केले.

स्वामी रामानंद तीर्थ आणि इतर प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा तसेच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील मुक्तिसंग्रामसैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचाही चव्हाण यांनी उल्लेख केला. औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी केलेले वंदे मातरम आंदोलन आणि त्याला काँग्रेस पक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस व पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी दिलेल्या समर्थनाचीही माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT