Ex.Mla Harshvardhan Jadhav BRS News
Ex.Mla Harshvardhan Jadhav BRS News Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav News : दीड रुपये किलोचा कांदा तेलंगणात १८ रुपयांनी विकणार, बीआरएसचा पुढाकार..

सरकारनामा ब्युरो

BRS News : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाने शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर लक्ष घातले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कमी भावामुळे हवालदिल झाला आहे. (Ex.Mla Harshvardhan Jadhav BRS News) दीड ते तीन रुपये किलो एवढ्या कवडीमोल भावाने कांद्याची खरेदी सुरू आहे. त्यामुळे कांदा रस्त्यावर फेकला जातोय, पुरून टाकला जातोय.

अब की बार किसान सरकार हे ब्रीद घेऊन नांदेड मार्गे महाराष्ट्रात सक्रीय होवू पाहणाऱ्या बीआरएसने या प्रश्नी लक्ष घातले आहे. माजी आमदार व बीआरएसचे सक्रीय सदस्य हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी कन्नड-सोयगांव मतदारसंघातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी त्यांचा कांदा तेलंगणात नेवून विकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

तेलंगणा मार्केट कमिटीमध्ये (Maharashtra) महाराष्ट्रात दीड ते तीन रुपये किलो विकला जाणारा कांदा तिकडे १८ रुपये दराने खरेदी केला जाणार असल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. (Kannad) हा कांदा तेलंगणात नेण्यासाठीची व्यवस्था बीआरएसकडून केली जाणार आहे, कांद्यासाठी बारदाना पोते प्रत्येकी ३५ रुपयांना मिळते ते देखील मोफत दिले जाणार असून तेलंगणात कांदा घेवून जाणाऱ्या उत्पादक शेतकऱ्याला हमाली देखील द्यावी लागणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.

कन्नडमधून कांदा तेलंगणाला जाणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ज्या शेतकऱ्याला आपला कांदा तेलंगणात विकायचा आहे, त्यांनी बीआरएसशी संपर्क साधावा असे आवाहन देखील जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे तेलंगणा सरकार, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मदतीला धावून आल्याचेही जाधव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT