Phulambri APMC News  Sarkarnama
मराठवाडा

Phulambri APMC News : उपसभापती पदाची संधी, पण कार्यकर्त्याला दिला बहुमान..

Shivsena : सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, या हेतूने दत्तात्रय करपे या कार्यकर्त्याला मान दिला.

नवनाथ इधाटे

Marathwada : फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Phulambri APMC News) निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटातील किशोर बलांडे व ठोंबरे यांचे दोन गट होते. पैकी बलांडे गटाने भाजपसोबत निवडणुक लढवली होती. तर ठोंबरे यांनी उमेदवार विजयी झाल्यानंतर पाठिंबा दिला होता. निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे या निवडणुकीत बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची निवड झाली.

तर उपसभापती पदी शिंदे गटाचे किशोर बलांडे यांचे नाव असताना त्यांनी स्वतः उपसभापती न होता दत्तात्रय करपे या कार्यकर्त्याला उपसभापती पदाच्या खुर्चीवर बसवून न्याय दिला. त्यांच्या या निर्णयाचे (Shivsena) शिवसेनेसह सर्वचजण कौतुक करत आहेत. (Bjp) बाजार समितीची निवडणूक आजी-माजी आमदारांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत आमदार हरिभाऊ बागडे यांनी भाजप शिवसेना शिंदे गटातील किशोर बलांडे गटाचे नेतृत्व केले.

तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे शिंदे गटात फूट पडल्याने किशोर बलांडे गट व राजेंद्र ठोंबरे गट वेगळा झाला. यात राजेंद्र ठोंबरे गटाला स्वबळावर दोन जागेवर विजय मिळवता आला. तर भाजप सोबत असलेल्या किशोर बलांडे गटाला तीन जागेवर यश मिळाले.

युतीचा धर्म पाळून किशोर बलांडे गटाने इमाने इतबारे युतीचे काम केले. यात भाजप व शिवसेना शिंदे गटातील किशोर बलांडे गट यांनी १५ पैकी १४ जागेवर यश मिळविले. या निवडणुकीत सर्वाधिक मतदान अनुराधा चव्हाण यांना मिळाल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांना सभापती पदी विराजमान केले. तर दुसरीकडे उपसभापती पदी शिवसेना शिंदे गटातील बलांडे गटाला देण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे या पदासाठी किशोर बलांडे यांचे नाव चर्चेत होते.

परंतू उपसभापती निवडीच्या वेळी किशोर बलांडे यांनी या सर्व चर्चेला पूर्णविराम देत दत्तात्रय करपे या कार्यकर्त्याला न्याय देऊन उपसभापती पदाच्या खुर्चीवर बसवले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उपसभापती पदासाठी माझ्या नावाच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु या शेतकऱ्यांच्या संस्थेत सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, या हेतूने दत्तात्रय करपे या कार्यकर्त्याला उपसभापती पदाचा मान दिला. याबद्दल समाधान वाटत असल्याचे बलांडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT