Hingoli APMC Chairman Election : हिंगोलीचे सभापती पद ठाकरेंच्या शिवसेनेला, उपसभापती पदी महायुतीचे श्रीरामे..

Shivsena : सभापती, उपसभापती पदासाठी मंगळवारी (ता.२३) बाजार समितीच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती.
Hingoli APMC Chairman Election, News
Hingoli APMC Chairman Election, NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : हिंगोली बाजार समितीच्या सभापती (Hingoli APMC Chairman Election) पदी निवडणुकी पुर्वी ठरल्याप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे राजेश पाटील गोरेगावकर यांची निवड झाली आहे. बाजार समिती निवडणूकीत ठाकरे गट, शिंदे गट, भाजपा,काँग्रेस व असंतुष्टांनी एकत्र येत स्थानिक महायुती करत संत नामदेव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. या महायुतीला दहा जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलला सहा जागेवर यश मिळाले होते.

Hingoli APMC Chairman Election, News
Rajesh Tope On ED Action : जयंत पाटील भान ठेवून काम करणारा व चांगले विचार जपणारा नेता

व्यापारी मतदार संघात माजी आमदार गजानन घुगे, शेख बुऱ्हाण हे देखील अपक्ष निवडून आले. (Hingoli) नेते विरुध्द कार्यकर्ते अशी ही निवडणूक झाली. यामध्ये आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख विनायक भिसे यांनी स्थानिक महायुती केली होती.

दरम्यान, पुर्वीपासून हिंगोली बाजार समिती (APMC Election) सभापती पद शिवसेनेकडे तर सेनगाव भाजपाकडे असा फाॅर्म्युला ठरला होता. त्या प्रमाणे सोमवारी झालेल्या सेनगाव बाजार समितीचे सभापती पद भाजपाकडे आले. त्यामुळे हिंगोली येथे (Shivsena) शिवसेनेचा सभापती होणार असे मानले जात होते. यात राजेश पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्याप्रमाणे मंगळवारी झालेल्या सभापती निवडीत हिंगोली येथील बाजार समितीचे सभापती पद शिवसेना ठाकरे गटाला मिळाले आहे.

सभापती, उपसभापती पदासाठी मंगळवारी बाजार समितीच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. यात सभापती पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे राजेश पाटील गोरेगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचे श्यामराव जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर हातवर करत मतदान घेण्यात आले. यात राजेश पाटील गोरेगावकर यांना १२ तर श्यामराव जगताप यांना सहा मते मिळाली.

यामुळे राजेश पाटील यांची सभापती पदी निवड झाली तर उपसभापती पदासाठी स्थानिक महायुती प्रणित संत नामदेव विकास पॅनलचे अशोक श्रीरामे व शेतकरी विकास पॅनलचे उतम वाबळे यांचे अर्ज आले. त्यानंतर उत्तम वाबळे यांनी माघार घेतल्याने अशोक श्रीरामे यांची बिनविरोध निवड झाली. हिंगोली विधानसभा निवडणुकीत आमदार तान्हाजी मुटकुळे व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे एकमेकांविरुध्द निवडणूक लढवतात. मात्र बाजार समितीच्या निवडणूकीत ते एकत्र आले. ठाकरे गट व शिंदे गट देखील बाजार समितीत सोबत होते हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com