Dr.Bhagwat Karad News Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat Karad Ready To Loksabha : नोव्हेंबरमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कथेचे आयोजन, कराडांना बागेश्वर धामचा आशीर्वाद मिळणार ..?

BJP News : भागवत कराड हे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची कथा आणि दरबार संभाजीनगरात भरवण्यास इच्छुक होते.

Jagdish Pansare

Marathwada Political News : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कोण लढवणार? यावर चर्चा सुरू असताना भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी तयारी सुरू केली आहे. (BJP Political News) आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक आहोत, अशी जाहीर इच्छा व्यक्त केल्यानंतर दिल्लीतून कराड यांना हिरवा कंदील मिळाल्याचे बोलले जाते. त्यानंतर कराडांच्या लोकसभा मोहिमेला चांगलाच वेग आला आहे.

याचाच एक भाग म्हणून प्रसिद्ध बागेश्वर बालाजी धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची कथा आणि दरबाराचे आयोजन येत्या ६, ७ व ८ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात करण्यात येणार आहे. (Dr.Bhagwat Karad) कराड यांनी नुकतीच मध्य प्रदेशातील खजुराहो येथील आश्रमात जाऊन भेट घेतली आणि त्यांना कथेसाठी गळ घातली.

धीरेंद्र शास्त्री यांनी दोन दिवसांची कथा आणि एक दिवस दरबार भरवण्यास मान्यता दिली असल्याचे कराड यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून सांगितले आहे. (BJP) जून महिन्यात छत्रपती संभाजीनगरात शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिओरवाले पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. (Shivsena) या कथेला केवळ महाराष्ट्रच नाही, तर बाहेरच्या राज्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.

तेव्हापासूनच भागवत कराड हे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची कथा आणि दरबार संभाजीनगरात भरवण्यास इच्छुक होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, पुढील महिन्यात हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या असताना भाजपने राज्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप ज्यांना लोकसभेची उमेदवारी देणार आहे, त्यांना आधीच तयारी लागण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जाते. भागवत कराड यांची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आता या तयारीने वेग घेतला असून, ही कथा याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे.

एकीकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा भाजप लढवणार की शिंदे गट? या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपने मात्र स्वतंत्रपणे तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून फक्त दावेच केले जात आहेत. संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल हे सगळेच आपल्याला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर आपण लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. इकडे मात्र भाजपच्या कराडांनी प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याची तयारी आणि प्रचारही सुरू केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT