Mla Ranajagjitsinha Patil
Mla Ranajagjitsinha Patil Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad : जिल्हा बॅंकेनंतर मतदारसंघातील निवडणुकीतही राणा पाटलांना दणका

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला. सर्व १५ जागा जिंकत शिवसेना- राष्ट्रवादी व काॅंग्रेसने भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का दिला. (ranajagjitsinha patil) यानंतर आता पुन्हा तुळजापूर या मतदारसंघात राणा पाटलांना पराभवाचे तोंड पहावे लागले. (Osmanabad) तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवत जिल्ह्यातील भविष्यातील राजकारण कसे असेल? हे स्पष्ट केले. (Marathwada)

जिल्हा बँकेनंतर तुळजापुर तालुका खरेदी विक्री संघावरही महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवित भाजपचा पराभव केला आहे. तुळजापुर येथे भाजपचे आमदार असतानाही त्याना पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीने सलग दुसरा विजय मिळविला. या अगोदर या ठिकाणी भाजपचे प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर झालेल्या जिल्हा बँकेसह दुसऱ्या निवडणुकीतही भाजपचा दारुण पराभव झाल्याने राणा पाटलांना धक्का बसला आहे.

तालुका खरेदी विक्री संघाच्या १३ जागेसाठी निवडणुक जाहीर झाली होती, त्यामध्ये एक जागा बिनविरोध निघाली होती. त्यामुळे रविवारी (ता.२७) बारा जागेसाठी मतदान झाले त्यानंतर मतमोजणी झाली व निकालामध्ये महाविकास आघाडीच्या बारापैकी नऊ जागा निवडुन आल्या. अगोदरची एक व आताच्या नऊ अशा एकुण दहा जागावर महाविकास आघाडी विजयी झाली आहे. त्यामध्ये शिवसेनेने सहा, काँग्रेस दोन व राष्ट्रवादी दोन जागेवर निवडुन आली आहे.

गेल्याच रविवारी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर एकाच आठवड्यात हा भाजपला दुसरा पराभवाचा धक्का बसला आहे. त्यातही सध्या भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील सध्या येथील नेतृत्व करत आहेत, तरीही त्याना याठिकाणी यश मिळविता आले नसल्याने भाजप आता महाविकास आघाडीशी टक्कर देऊ शकत नाही हे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे जिल्हा बँक निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुर तालुक्याच्या विकास सेवा सोसायटीच्या जागेवर त्याचे विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण यांच्याविरोधात दाखल केलेल्या उमेदवाराचा अर्ज काढुन घेतल्याने तर्कवितर्क लढविले गेले होते. स्वतःच्या मतदारसंघातील एखादी महत्वाची जागा सोडुन दिल्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा सूरु होती.

आता खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही अशाचप्रकारे एकतर्फी विजय मिळवुन महाविकास आघाडीने भाजपला धोबीपझाड दिला आहे. भाजप सत्तेत असताना त्यांनी काही ठिकाणी पक्षाचे प्रशासकीय मंडळ अशा संस्थावर नियुक्त केले होते. खरेदी विक्री संघावर देखील भाजपचेच प्रशासकीय मंडळ होते, ते प्रशासकीय मंडळ निवडणुकीच्या माध्यमातुन हटवुन टाकण्यात महाविकास आघाडीला यश आले. सलग दोन विजयाने महाविकास आघाडी चांगलीच चार्ज झाली आहे, तर भाजप मात्र बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT