MLA Santosh Bangar Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar Video Viral: नाहीतर, तुमच्या गाड्या जाळून टाकतो; संतोष बांगरांचा पुन्हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

Santosh Bangar Controversial Video Viral: बांगर यांच्या या प्रकारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आवार घालणार की नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

सरकारनामा ब्युरो

Hingoli Politics: हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांचे वादग्रस्त व्हिडिओ सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात. काही महिन्यांपुर्वी बांधकामांवरील कामगारांना मोफत मध्यान भोजनाची योजनेत अन्न निकृष्ट असल्याचे त्यांनी थेट संबधित व्यवस्थापकालाच मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.काही दिवसांपुर्वी त्यांचा फोनवरील संभाषणाचा एक ऑडियो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी थेट कॉन्ट्रक्टरलाच धमकावलं आहे. (Otherwise, burns your cars; Controversial video of Santosh Bangar again viral)

मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कडपदेव परिसरात पाईपलाईनचे काम सुरु होते. याठिकाणी काम करताना मारुती डाखोरे नावाचा कामगार जखमी झाला. पण कॉन्ट्रॅक्टर त्याला उपचारासाठी पैसे देत नव्हता. ही गोष्ट आमदार बांगर यांना कळताच त्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन केला आणि फोनवरच कॉन्ट्रॅक्टरला झापलं. तुमच्या कामावर काम करणारा मजूर जखमी झाला आणि त्याला तुम्ही नुकसान भरपाई का देत नाही,असा जाब त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला विचारला. यावेळी बांगर चांगलेच भडकले होते. (Political news)

इतकेच नव्हे तर, मजूराला नुकसान भरपाई द्या नाहीतर तुमचे काम बंद करून तुमच्या गाड्या जाळून टाकू, अशी थेट धमकीच त्यांनी दिली. आमदार बांगर यांच्या धमकीवजा इशाऱ्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरने मजुराला उपचारासाठी पैसे देण्याचे आश्वास दिले. मात्र कायदेशीर मार्गांचा अवलंब न करता वारंवार धमक्या देणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे या असे प्रकार करत असल्याने कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या प्रकाराला आवर घालणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT