Congress News : धक्कादायक : काँग्रेस महिला अध्यक्षाचा दोन नेत्यांकडून छळ ; राहुल गांधींनी दखल न घेतल्यामुळे महिला आयोगाकडे धाव..
Angkita Dutta Allegation Harassment Srinivas BV Vardhan Yadav : आसाम यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अंगकिता दत्ता यांनी यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी आणि प्रभारी सचिव वर्धन यादव यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप केला आहे.
केंद्रीय पक्ष नेतृत्वाने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे डाँ. दत्ता यांनी महिला आयोगाने धाव घेतली आहे. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
"मी एक महिला नेता आहे, महिला असल्यामुळे श्रीनिवास बीवी आणि वर्धन यादव हे मला तुच्छतेची वागणुक देत आहेत. याबाबत मी राहुल गांधी यांच्याकडेही तक्रार केली होती, पण त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. माझ्याशी संवाद साधताना हे दोन्ही नेते 'ए लडकी'असा उल्लेख करीत असतात.
रायपूर येथे काँग्रेच्या अधिवेनात या दोन्ही नेत्यांनी माझ्यासोबत अपमानकारक शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे त्रस्त आहे. "तु काय पीते, कुठली दारु पीते," अशा प्रकारचे ते प्रश्न विचारतात. भारत जोडो यात्रेत मी सहभागी झाले होते, तेव्हा त्यांच्याविरोधात मी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. सहा महिन्यापासून मला ते अशा प्रकारचा त्रास देत आहेत, अशी तक्रार डॉं. अंगकिता दत्ता यांनी महिला आयोगाकडे केली आहे.
डाँ. दत्ता म्हणाल्या, "मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासोबतचे काही पोस्टर त्यांच्याकडून तयार केले जात आहेत. माझे वडील, आजोबा हे राज्य काँग्रेसचे अध्यक्ष होते. पक्ष सोडण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला पक्षाच्या बाहेर तुम्ही काढू शकता, पण आमचे पक्षावर प्रेम आहे, असे डाँ. दत्ता यांना सांगितले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत संगनमत करीत असल्याचा आरोप वर्धन यादव यांनी माझ्यावर केला आहे, असे डाँ. अंगकिता दत्ता यांनी म्हटलं आहे. आसामचे माजी मंत्री अंजन दत्ता यांच्या त्या कन्या आहेत. ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. डाँ. अंगकिता यांनी काँग्रेसकडून अममुरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.