Aurangabad Political News : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाचे आंदोलन पोलिस बळाचा वापर करत चिरडण्यात आले. (AIMIM News) या विरोधात राज्यभरात पडसाद उमटतांना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जुंपलेली असतांना एमआयएमने आपली भूमिका मांडली आहे.
पक्षाचे खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मराठ्यांच्या संघर्षाला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. इम्तियाज यांनी अंतरवाली सराटी घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्विट करत आपल्या पक्षाची भूमिका मांडली. (Marathwada) मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहे.
सत्ताधारी सरकार आणि त्यांचे नेते विरोधात असताना मराठा आरक्षणाची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यानंतर समाजाला काय देत आहेत ते पहा ! प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा आणि मागण्याचा अधिकार आहे. (Maratha Reservation) पण त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे निषेधार्ह आणि अत्यंत निषेधार्ह आहे. एआयएमआयएम मराठ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देत आहे, असे इम्तियाज यांनी म्हटले आहे.
काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस कर्मचाऱ्यांनाही इजा पोहचली. या घटनेनंतर आज दुसऱ्यादिवशी राज्याच्या विविध भागात संतप्त पडसाद उमटत आहेत.
बस, वाहनांची जाळपोळ दगडफेकी सारख्या घटना. तर दुसरीकडे राज्यभरातील नेत्यांची अंतवाली सराटीकडे धाव, यामुळे राजकीय वातावरण चागंलचे तापले आहे. मराठा आरक्षणा सारख्या विषयात एमआयएमने देखील आपली भूमिका स्पष्ट करत पाठिंबा दर्शवला आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.