Ashok Chavan On Maratha Reservation : आंदोलन चिरडता येणार नाही, मराठा आरक्षण कसे देणार ? सरकारने भूमिका स्पष्ट करावी...

Reservation News : मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. (Ashok Chavan News) राज्याच्या विविध भागातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज पहाटेपासूनच राजकीय पक्षांचे नेते अंतवाली सराटीत येऊन आंदोलकांची व जखमीची भेट घेत आहेत.

Ashok Chavan News
Maratha Reservation News : जालन्यात आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक-जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार..

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेत अशोक चव्हाण यांनी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठी हल्याचा निषेध करत सरकारला धारेवर धरले आहे. (Maratha Reservation) बळाचा वापर करून तुम्हाला आंदोलन चिरडता येणार नाही. मराठा आरक्षण कसे देणार हे सरकारने स्पष्ट करावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. (Ashok Chavan) चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. (Marathwada) आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हीडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो.

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे.

मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com