Padmasinh Patil acquittal : काँग्रेस नेते पवन राजेनिंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या दोन दशकांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (वय ८६) यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका केली होती.
त्या निर्णयाला राजेनिंबाळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने त्यांच्या अपिलाची दखल घेऊन पाटील आणि इतर आरोपींना नोटीस बजावली आहे. प्रकरणातील मूळ तक्रारदार आणि शिवसेनेचे धाराशिव येथील खासदार ओम राजेनिंबाळकरांच्या आई आनंदीदेवी यांनी पाटील यांच्या निर्दोषत्वाला आव्हान आहे.
या अपिलावर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी (ता. १) सुनावणी झाली. तेव्हा सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. पाटील आणि पवनराजे हे राजकीय प्रतिस्पर्धी होते हे सिद्ध झाले आहे, त्यांनी एकमेकांविरुद्ध विविध तक्रारी आणि प्रतितक्रारी दाखल केल्या होत्या.
असे असले तरी पाटील हे या हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते हे सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे, अशी टिप्पणी करून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी निकालात नमूद केले होते. तपास यंत्रणेने सादर केलेला पुरावा अमान्य केला होता. माफीचा साक्षीदार पारसमल जैनची साक्ष खटल्यात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून सादर करण्यात आली.
परंतु पारसमल जैनला १५ दिवस बेकायदा कोठडीत ठेवून त्यांचा छळ करण्यात आला होता. त्यामुळे ती संशयास्पद असून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असेही निकालपत्रात अधोरेखित करून विशेष न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांच्यासह इतरांची निर्दोष सुटका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.