BMC transfer rate card : मुंबई महापालिका अभियंत्यांच्या बदल्यांचे ‘रेट कार्ड’? मिहिर कोटेचा यांची मुख्य सचिवांकडे तक्रार

Mihir Kotecha alleges irregularities in BMC engineers’ transfers and seeks a probe : 165 अभियंत्यांच्या बदल्यांपासून नव्या नियुक्त्यांपर्यंत अनियमिततेचा आरोप; 5 ऑगस्टला मागितलेली माहिती 26 दिवसांनीही न मिळाल्याचा कोटेचा यांचा दावा
Mihir Kotecha
Mihir KotechaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Corporation transfers : मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांवरून पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पैसे घेऊन बदल्या करण्यात आल्याचा दावा भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला असून, या बदल्यांचे कथित ‘रेट कार्ड’ आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत कोटेचा यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

भाजप आमदार कोटेचा यांनी आपल्या तक्रारीत माहिती देण्यास विलंब केल्याचा आरोप अतिरिक्त महापालिका (Municipal Corporation) आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यावर केला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांची भूमिका आणि बदल्यांमधील कथित अनियमितता तपासावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपच्या (BJP) कोटेचा यांच्या आरोपानुसार, 2026 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी 165 अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्यानंतर मुख्यमंत्री स्तरावरून त्या बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 15 मे 2026 रोजी यातील सुमारे 50 टक्के बदल्यांचा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

Mihir Kotecha
BMC officer transfers : मुंबई महापालिकेतील 225 बदल्यांवर राजकीय शिफारशींची छाप; RTIतून मोठा खुलासा

या प्रस्तावाबाबत कोटेचा यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिल्यानंतर संबंधित यादी रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, त्यानंतरच्या दोन-तीन महिन्यांत झालेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. या बदल्यांसंदर्भातील कथित ‘रेट कार्ड’ आपल्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Mihir Kotecha
Mumbai Mayor Election : महापौरपदासाठी शिंदे शिवसेनेचे ‘मिशन टायगर’! राऊत म्हणाले, ‘दोन दिवस कुणाला फोडले नाही तर...’

प्रशासन माहिती देईना

या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी कोटेचा यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे काही विशिष्ट माहिती मागितली होती. मात्र, 26 दिवस उलटूनही संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. माहिती देण्यास झालेला विलंब संशय निर्माण करणारा असून, त्यामागे काही गैरव्यवहार दडले आहेत का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे कोटेचा यांनी म्हटले आहे.

रेट कार्डचा दाव्याने खळबळ

दरम्यान, अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये कथित आर्थिक व्यवहार झाले का, ‘रेट कार्ड’चा दावा कितपत खरा आहे आणि माहिती देण्यास विलंब का झाला, याची स्वतंत्र चौकशी झाल्यानंतरच या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

कारवाईचा मागणी

मुख्य सचिवांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मिहिर कोटेचा यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com