Paithan Market Committee Election News
Paithan Market Committee Election News Sarkarnama
मराठवाडा

Paithan Market Committee : एकाच उमेदवाराचे दोन जात प्रमाणपत्र, खंडपीठात याचिका..

सरकारनामा ब्युरो

Paithan News: पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee) निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघ अनूसुचित जातीसाठी राखीव आहे. या जागेसाठी पैठणचे माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब बाजीराव गायकवाड यांनी अनूसुचित जाती संवर्गातून नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे. त्यांच्याकडे दोन जात प्रमाणपत्र असल्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

करंजखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कारभारी देवराव लोहकरे यांनी अ‍ॅड. आनंदसिंह बायस यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. (Paithan) याचिकेत म्हटले आहे की, अप्पासाहेब बाजीराव गायकवाड हे अनूसुचित जातीचे नसतांना त्यांनी नामनिर्देशनपत्र सादर केलेले आहे. (Aurangabad High Court) याबद्दल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात आक्षेप नोंदविण्यात आलेला होता.

परंतु आक्षेपाची नोंद घेण्यात आलेली नाही व आप्पासाहेब गायकवाड यांचे नामनिर्देशनपत्र अनूसुचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघातून स्विकारले गेले आहे. (Marathwada) आप्पासाहेब गायकवाड विमुक्त जातीचे आहेत. त्यांना उपविभागीय अधिकारी पैठण यांनी विमुक्त जातीचे प्रमाणपत्रही निर्गमित केलेले आहे. त्याआधारे २००६ ते २०१६ पर्यंत इतर मागासवर्गीयसाठी राखीव संवर्गातून ते नगरसेवक होते.

त्यांनी उपनगराध्यक्ष हे पदही भुषविले आहे. त्यांचे हे जात प्रमाणपत्र विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरविलेले आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद हे ग्रामपंचायत अनूसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. आप्पासाहेब गायकवाड हे पैठण येथील मूळ रहिवासी असतानाही त्यांनी उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांच्याकडून अनुसूचित जातीचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याआधारे सदर प्रमाणपत्र वैध ठरवून घेतले.

आता विमुक्त जमाती व अनूसुचित जाती या संवर्गाचा फायदा घेण्याचा ते प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. त्यांचे नामनिर्देशन पत्र त्वरीत रद्द करण्यात यावे, दोन जात प्रमाणपत्रे काढल्याबाबत चौकशी करुन कारवाई करावी, अशी विनंतीही याचिकेत केली आहे.

याचिकेत मुख्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा सहकार विभाग, संचालक पणन महासंघ, कृउबा पैठण, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी पैठण व आप्पासाहेब गायकवाड यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणी अ‍ॅड. आनंदसिंह बायस यांना अ‍ॅड. राजेश मालोदे सहकार्य करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT