Maharashtra Politics : शिवसेनेतून फुटल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सरकारमधील १६ आमदार अपात्र ठरविण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने केली आहे. त्या याचिकेचा निर्णय कधीही येऊ शकतो. मात्र न्यायालयाला कुणालाही अपात्र ठरविण्याचा अधिकार नाही. न्यायालय जास्तीत जास्त तत्कालीन उपसभापती झिरवळ यांच्या निर्णयावर जो 'स्टे' दिला होत तो कदाचित उठविला जाईल. तसेच राज्यपालांच्या निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. हा घटनात्मक मुद्दा आहे. राज्यपालांच्या निर्णयावर ताशेरे ओढले जातील, मात्र त्यांचा निर्णय फिरवला जाणार नाही, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकारांनी व्यक्त केले.
मुंबईतील साकीनाका येथे आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या सरकारबाबत अस्थिर वातावारण असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यावर आंबेडकरांनी सूचक वक्तव्य केले.
ते म्हणाले, "ज्यावेळी आपण म्हणतो राजकीय भूकंप होतो, त्यावेळेस त्याची काही लक्षणे दिसतात. दरम्यान राज्यातही तसेच दिसून आले. त्याबाबत मात्र मोठ्या प्रमाणात बातम्या झाल्याने होणारा भूकंप होता होता थांबला." तसेच ते दोन राजकीय भूकंप होणार या वाक्यावरही ते ठाम राहिले. आंबेडकर म्हणाले, यापूर्वी मी जे दोन भूकंपाबाबत विधान केले आहे, त्यावर आताही कायम आहे. मात्र त्यातील सर्व सांगतले तर रस निघून जाईल. म्हणून ते मांडण्यात काही अर्थ नाही."
कर्नाटकमध्ये (Karnataka Election) भाजपला पुन्हा सत्ता मिळणे कठीण असे मतही त्यांनी यावेळी केले. आंबेडकर म्हणाले, "सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक आहे. तेथे सर्व विरोधी पक्ष भाजपला रोखू शकले तर आगामी लोकसभेचा खेळ वेगळा असणार आहे. कर्नाटकची रिपब्लिकन पार्टी १५ जागांवर लढत आहे. मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे, परंतु त्याचे सरकारी काँग्रेस आणि कुमार स्वामी यांना अडचण होणार नाही याची काळजी घेणार आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होऊ नये, याचाही विचार करणार आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची काही लक्षणे दिसत नाहीत."
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे. त्यामुळे राज्यातील या निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, "मुंबई महापालिकेसह राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला असता. या निवडणुकीमुळे राज्याच्या विधानसभेसह देशाच्या राजकारणाची दिशा ठरली असती. त्यामुळेच महाराष्ट्रातील (Maharashtra) या निवडणुका राज्य सरकारने पुढे ढकलल्या आहेत."
पुलवामा घटनेवरुन आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला. आंबेडकर म्हणाले, "पुलवामा घडले त्यावेळी मी शंका उपस्थित केली होती. मात्र एकाही कॅबिनेट मंत्र्याने अमित शहा यांना प्रश्न केला नाही. हा घातपात असून त्या घटनेच्या चौकशीची मागणीही मी केली होती. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा कारणीभूत आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.