Raosaheb Danve-Santosh Danve News Sarkarnama
मराठवाडा

MLA Santosh Danve News : पंचायत राज वर 'दानवे राज'! भोकरदनला मिळाला चौथ्यांदा मान

Panchayat Raj Chairmanship awarded to Bhokardan for the fourth time, while the Danve family gets the opportunity for the third time. : दानवेंच्या सूचनेनुसार विधिमंडळात तेव्हा त्या अभियंत्याला शिक्षा देखील झाली होती. तीस वर्षानंतर रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना योगायोगाने हे पद मिळाले आहे.

Jagdish Pansare

तुषार पाटील

Bhokardan News : महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांवर जाहीर झालेल्या नियुक्त्यांमध्ये भाजपकडून पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी भोकरदन-जाफ्राबादचे आमदार संतोष दानवे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापुर्वी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आमदार असतांना त्यांनाही या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांनीही हे पद याआधी भुषवलेले आहे.

त्यामुळे खऱ्या अर्थाने पंचायत राज वर 'दानवे राज'असे म्हटले जात आहे. या शिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भोकरदनला चौथ्यांदा पंचायत राजचे अध्यक्षपद मिळाले आहे. 'पंचायत राज'च्या माध्यमातून हे पद तीस वर्षानंतर दानवेंच्याच घरात पुन्हा एकदा आले आहे. संतोष दानवे यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे युती सरकारच्या काळात पंचायत राज समितीचे अध्यक्ष होते.

रावसाहेब दानवे याची तेव्हाची कारकीर्द चांगलीच चर्चेत होती. पंचायत राज समितीच्या बुलढाणा येथील दौऱ्यात जलसिंचन विभागातील एका उपअभियंताने चुकीची माहिती दिल्यामुळे रावसाहेब दानवे यांनी त्याच्यावर कारवाईसाठी विधिमंडळाच्या हक्क भंग समिती समोर प्रस्ताव ठेवला होता. (Santosh Danve) दानवेंच्या सूचनेनुसार विधिमंडळात त्यावेळेस त्या अभियंत्याला शिक्षा देखील झाली होती. तीस वर्षानंतर रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना योगायोगाने हे पद मिळाले आहे.

रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांची कार्यशैली व पद्धत वेगळी असली तरी झटपट व रोखठोक भूमिकेसाठी ते ओळखले जातात. संतोष दानवे हे तिसऱ्यांदा निवडून आले असून पंचायतराज समितीच्या या पदावर काम करताना वडील रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकीर्दीचा अनुभव त्यांना कामी येणार आहे.

असाही योगयोग

भोकरदन तालुक्याला चौथ्यांदा पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. पहिल्यांदा 1985 ते 90 च्या कार्यकाळात काँग्रेसचे आमदार संतोषराव दसपुते हे पंचायत राज समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर युती सरकारच्या काळात 95 ते 99 दरम्यान रावसाहेब दानवे अध्यक्ष होते. तर आघाडी सरकारच्या कार्यकाळात अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत दानवे यांना अध्यक्ष पद मिळाले होते. आता महायुती सरकारच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युवा आमदार संतोष दानवे यांना हे पद मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT