Beed News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यात पक्षाच्या विविध नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व विधान परिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर सामाजिक संपर्काची जबादारी देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यात आमदार पंकजा मुंडेंकडे सामाजिक संपर्काची जबादारी असेल.
पंकजा मुंडे या भाजपमधील(BJP) महत्त्वाच्या लिडर आहेत. त्यांना दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा आहे. भाजपची राज्यात बहुजनांचा पक्ष अशी प्रतिमा तयार करण्यात दिवंगत मुंडेंचाच मोठा वाटा आहे. पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर अनेक पदांवर काम केलेले आहे.
2019 च्या पराभवानंतर पक्षामधून डावलले जात असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना होती. 2014 मध्ये पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेचा भाजपला सत्तेत येण्यासाठी मोठा फायदा झाला होता. दरम्यान, लोकसभेतील पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली. आता त्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.