Abdul Sattar : मंत्री सत्तारांना ‘मविआ’चा ‘हा’ शिलेदार देणार टक्कर

Abdul Sattar Vidhan Sabha Election : राज्याचे अल्पसंख्यांक विकास व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात महाविकास आघाडीतील कोणता घटक पक्ष उमेदवार देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
abdul sattar
abdul sattarSarkarnama
Published on
Updated on

Sillod Vidhansabha: विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्रासह मराठवाड्यात नवे चेहरे पक्षात आणत महायुतीच्या विरोधात दंड थोपटले आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट करत असलेले प्रयोग त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा आणि त्या मतदारसंघातील विधानसभेच्या किती जागा लढवता येतील यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अशावेळी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात महाविकास आघाडीतील कोणता घटक पक्ष उमेदवार देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या (Shivsena) धनुष्यबाणावर निवडणूक लढवत जिंकली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात सहभागी होत सत्तार यांनी पक्षाशी गद्दारी केली. याचा वाचपा उद्धव ठाकरे यांना काढायचा आहे. मात्र सलग तीन निवडणुकींमध्ये विजय मिळवत मतदारसंघावर मजबूत पकड ठेवून असलेल्या सत्तार यांच्यासमोर टिकाव लागू शकेल, असा उमेदवार सध्या तरी ठाकरे गटाकडे नाही. जी दोन-पाच नाव चर्चेत आहेत ती सत्तारांना पराभूत करू शकतील एवढ्या ताकदीची नाही, अशावेळी महायुतीतील भाजपचा एखादा उमेदवार आयात करून ठाकरे गट सत्तार यांच्या विरोधात लढण्याची हौस भागवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

abdul sattar
National Election Watch: भाजपच्या 75 उमेदवारांचे लीड घटले; गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्क्यांची घसरण

महायुती ही जागा सहाजिकच अब्दुल सत्तार यांच्या शिवसेनेकडे (Shivsena) राहील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केलेल्या दगा फटक्याचा सूड उगवण्यासाठी भाजपमधून एखादा उमेदवार महाविकास आघाडीकडे पाठवून त्याला रसद पुरवण्याची खेळी रावसाहेब दानवे यांच्याकडून केली जाऊ शकते. दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्ष ही जागा ठाकरे गटाकडून घेऊन सत्तार यांच्या विरोधात मराठा उमेदवार देऊ शकते.

यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून ठाकरे गटातील काही इच्छुकांनीही आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात घेऊन तुतारीकडे आपला मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांच्या पराभवासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने अपक्ष प्रभाकर पालोदकर यांच्या मागे ताकद उभी केली होती. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने नावासाठी म्हणून पक्षाने उमेदवार दिला होता. परंतु काँग्रेसची सगळी ताकद पालोदकर यांच्यासाठी काम करत होती.

abdul sattar
Shivsena UBT News : ठाकरेंनी शब्द फिरवला, माजी आमदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र..

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाही अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सत्तावीस हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत हॅट्रिक केली होती. गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देत सत्तार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते पटकावले. मतदारसंघात निधी आणि विविध योजना आणत विरोधकांना आधीपासूनच नामोहरम केले.

आर्थिक आणि राजकीय डावपेच आखण्यात माहीर असलेल्या सत्तार यांना पराभूत करण्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती आणि एकजूट सध्यातरी महाविकास आघाडीत दिसून येत नाही. मतदारसंघात अब्दुल सत्तार नको, हिंदू आमदार पाहिजे असा मतप्रवाह असला तरी सक्षम पर्याय देण्यास महाविकास आघाडी अपयशी ठरताना दिसत आहे.

abdul sattar
Shivsena UBT News : ठाकरेंनी शब्द फिरवला, माजी आमदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची खेळी सिल्लोडमध्ये यशस्वी ठरते का? ही जागा ठाकरे गट त्यांना सोडणार का? यावर सिल्लोड विधानसभा निवडणुकीचे चित्र आणि आमदार ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर गेलेल्या माजी खासदार रावसाहेब दानवे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com