BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News  Sarkarnama
मराठवाडा

माना की औरो के मुकाबले कुछ पाया नही हमने, पर खुदको गिराकर...पंकजांचा टोला कुणाला?

सरकारनामा ब्यूरो

बीड : आज दसऱ्या निमित्ताने राज्यात चार दसरा मेळावे होत आहेत. यामध्ये मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. तर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा होत असून बीड जिल्ह्यात भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावात भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा नुकताच संपन्न झाला आहे.

या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे नुकतेच भाषण झाले असून त्यांनी आपली भूमिका मांडली.'माना की औरो के मुकाबले कुछ पाया नही हमने, पर खुदको गिराकर कुछ उठाया नही हमने', अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मात्र त्यांचा हा टोला नेमका कुणाला? तो विरोधी पक्षाला की पक्षातील विरोधकांना याबाबतची चर्चा आता रंगायला सुरूवात झाली आहे. (BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News )

बीड जिल्ह्यातील भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावात भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा आज संपन्न झाला आहे. या मेळाव्यात पंकजा यांनी आपल्या सडेतोड अंदाजात भाषण करत आपल्याला कुठलीही अपेक्षा नाही, आपण २०२४ च्या निवडणुकीची तयारी करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, मुंडेसाहेबांना कधी संघर्ष चुकला नाही, मलाही चुकणार नाही. मेळावा म्हटलं की, टीका होते, चिखलफेक होते. पण आमच्या मेळाव्यात काय होईल, हे सर्वांनाच माहित आहे. आमचा हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे,' अशा शब्दात पंकजा यांनी राज्यात इतर होणाऱ्या मेळाव्यांना टोला लगावला.

पुढे त्या म्हणाल्या की, मी कुणाविषयी काय बोलणार..मी माझ्या आयुष्यात, मुंडे साहेबांचे विरोधक किंवा माझे विरोधक, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांनाही मी कधीच बोलले नाही. मी कधीच संधीचा फायदा घेत, टीकाकारांना प्रत्युत्तर दिले नाही आणि कधीही कोणाविषयी वाईट किंवा खालच्या पातळीवर बोलले नाही. ते आमच्या रक्तातच नाही,' अशा शब्दात पंकजा यांनी विरोधकांना सुनावले.

याबरोबरच त्यांनी आपल्या भाषणात शेरो-शायरी करत विरोधकांना सुनावले. त्या म्हणाल्या की 'हकीकत को तलाश करना पडता है, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती है!, 'माना की औरो के मुकाबले कुछ पाया नही हमने, पर खुदको गिराकर कुछ उठाया नही हमने', अशा शब्दात त्यांनी पक्षाबाहेरील आणि पक्षातील विरोधकांना सुनावले.

माझ्या समाजीतील लोकांना पदे मिळाली त्याचा मला आनंदच आहे. आणि मला काही मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. मात्र मी आज सांगते की मी आता २०२४ च्या निवडणुकीची तयारीला लागली आहे. यामुळे तुम्हीही या चर्चा थांबवा, असे आव्हानही त्यांनी केले. तसेच मी स्वाभीमान तुम्हाला दिला आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षातूनच डावलण्यात आले आहे. याबाबत अनेकदा चर्चाही झाल्या आणि पंकजा यांच्या समर्थकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मात्र त्यांच अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. याउलट त्यांच्या समर्थकांना आमदारकी, राज्यसभेची खासदारकी आणि चक्क केंद्रात मंत्री पदाची लॅाटरी देखील लागली आहे. मात्र पंकजा यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळेच पंकजा यांनी माना की औरो के मुकाबले कुछ पाया नही हमने, पर खुदको गिराकर कुछ उठाया नही हमने, अशा शब्दात त्यांनी पक्षाबाहेरील आणि पक्षातील विरोधकांना सुनावल्याची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT