Beed : दसरा मेळाव्यासाठी प्रितम मुंडेंची गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड वाहन फेरी

सकाळी डॉ. मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन फेरीला सुरुवात केली. (Dr.Pritam Munde)
Mp.Pritam Munde Rally In Sawargaon, Beed News
Mp.Pritam Munde Rally In Sawargaon, Beed NewsSarkarnama
Published on
Updated on

बीड : भगवान भक्तीगडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्या निमित्त खासदार डॉ. प्रितम मुंडे (Pritam Munde) यांच्या नेतृत्वाखालील वाहन फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. (Beed) जागोजागी कार्यकर्त्यांनी डॉ. मुंडे यांचे जंगी स्वागत केले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्‍चात भगवान गडावर राजकीय भाषण नाही, अशी भूमिका गडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली.

त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सुरुवातीला भगवान गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घेतला. नंतर संत भगवान बाबांचे जन्मस्थान सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे दसरा मेळाव्याला सुरुवात करुन या ठिकाणचे भगवान भक्तीगड असे नामकरण केले. या ठिकाणी संत भगवान बाबांची भव्य मुर्ती व स्मृतीस्थळही उभारले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या दसरा मेळाव्यांपासून त्यांच्या भगीनी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड अशी वाहन फेरी निघते. बुधवारी सकाळी डॉ. मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन फेरीला सुरुवात केली.

Mp.Pritam Munde Rally In Sawargaon, Beed News
Marathwada : शिंदे गटात प्रवेश करणारा मराठवाड्यातील `तो` खासदार कोण ?

परळी तालुक्यातील सिरसाळासह विविध गावांत तसेच दिंद्रुड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फेरीवर फुलांचा वर्षाव केला. रस्त्याच्या दुतर्फा उपस्थितांना डॉ. मुंडे अभिवान करत होत्या. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बीडहून ही फेरी भगवान भक्तीगडाकडे मार्गस्थ झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com