Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : ...म्हणून पंकजा मुंडेंनी 'त्या' वाडीत जाऊन उभारली गुढी!

Dattatrya Deshmukh

Beed Loksabha Election : पंकजा मुंडे सर्व सण, वार व उत्सव उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करत असतात. दरवर्षी हिंदू नववर्षानिमित्त त्या आपल्या मुंबई किंवा परळीतल्या घरी गुढी उभारत असतात.

यंदा, मात्र त्यांनी एका वाडीत जाऊन पाडवा सण साजरा करत गुढी उभारली. त्याचे कारणही तसेच आहे. या गावाने मागच्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना शंभर टक्के मतदान केले होते. ऊसतोड मजुरांचे गाव असलेल्या शिरूर कासार तालुक्यातील धनगरवाडी गावात त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत देखील उत्साहात केले.

लोकसभा निवडणुकीत भाजपने दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची उमेदवारी टाळून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना रिंगणात उतरविले आहे. पंकजा मुंडे यांचे सध्या जोरदार प्रचार दौरे सुरु आहेत. दरम्यान, चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात मराठी नववर्षाच्या सुरवातीला येणाऱ्या गुढी पाडवा सणाला विशेष महत्त्व असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे सर्वच सण साजरे करत असतात. यंदा मात्र त्यांनी हा सण आपल्या घरी करण्या ऐवजी एका वाडीत साजरा केला. या धनगरवाडीत मागच्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांना शंभर टक्के मतदान केले होते. त्यांनी कालच सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती.

धनगरवाडीत आगमन होताच पंकजा मुंडे यांचे ग्रामस्थांनी वाजतगाजत जंगी स्वागत केलं. महिलांनी त्यांचं औक्षण करून केलं. विधिवत पूजन करून वस्तीत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

ज्या गावात कष्टकरी लोकं राहतात, जे नव्वद- पंच्यान्नव टक्के मतदान करतात अशा लोकांसोबत सण साजरा करावा हे मी ठरवले होते. इथं ग्रामस्थांनी माझं जोरदार स्वागत केलं, त्यांच्यासमवेत भोजनही केलं, त्यांच्याशी संवादही साधला. आजच्या गुढी पाडव्याच्या दिवशी मी एकच संकल्प केला आहे, तो म्हणजे मी बीड जिल्हयाच्या अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होईल असं पंकजा म्हणाल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT