Parbhani Loksabha Constituency : जाधव की जानकर? परभणीचा बाॅस कोण होणार ?

Loksabha Election 2024 : ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आरक्षणाच्या मुद्यावरुन सुरू असताना जानकरांनी दिल्ली गाठण्यासाठी परभणीचा पर्याय निवडला.
Mahadev Jankar - Sanjay Jadhav
Mahadev Jankar- Sanjay Jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत असलेल्या लोकसभेच्या परभणी मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता एकूण 34 उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय जाधव यांच्यात सामना होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना उमेदवारी देत ही लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण वंचितचा ऐनवेळी उमेदवार बदलून डख यांना मैदानात उतरवण्याचा अंदाज किती बरोबर ठरतो हे त्यांना मिळालेल्या मताच्या आकडेवारीवरून स्पष्ट होणार आहे. सध्या तरी परभणीतील ही लढत जानकर विरुद्ध जाधव अशीच आहे.

Mahadev Jankar - Sanjay Jadhav
Devendra Fadnavis : राज ठाकरेंच्या नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंब्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आरक्षणाच्या मुद्यावरुन सुरू असताना जानकरांनी दिल्ली गाठण्यासाठी परभणीचा पर्याय निवडला. धनगर, ओबीसींची निर्णायक मते पाहता जानकरांचा परभणीतून लढण्याचा निर्णय तसा योग्यच म्हणावा लागेल. पण स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा जानकरांसाठी अडचणीचा ठरू शकतो. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे संजय जाधव तिसऱ्यांदा परभणीतून नशीब आजमावत आहेत.

बाॅस नावाने ओळखले जाणारे संजय जाधव यांना परभणीकर तिसऱ्यांदा बाॅस बनवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मराठा मतदारांवर जाधव यांची मदार असणार आहे. महाविकास आघा़डीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद त्यांच्यासोबत असणार आहे. पैकी राष्ट्रवादीची शक्ती दोन ठिकाणी विभागली गेली आहे, तर काँग्रेसमधील मराठवाड्यातील अशोक चव्हाण यांच्यासारखे बडे नेते भाजपमध्ये गेल्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम जाणवू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपसोबत नसल्याची भरपाई काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भरून निघेल, अशी आशा जाधव बाळगून आहेत. शिवसेना ठाकरे गटाची मशाल विरुद्ध महायुतीचे जानकर यांच्या शिट्टी या निवडणुकी निशाणीमध्ये होणारी काँटे की टक्कर यावेळी राज्याचे लक्ष वेधून घेणार आहे. महादेव जानकर Mahadeo Jankar यांच्यासाठी महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे.

तर संजय जाधव Sanjay Jadhav यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्ह्यातील आघाडीचे स्थानिक नेते होते. आता उद्धव ठाकरे संजय जाधव यांच्यासाठी परभणीत सभा कधी घेणार? याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे. तर जानकरांसाठी राज्यातील भाजपचे नेते सभा घेऊन जोर लावणार आहेत. हिंदुत्ववादी मतदार यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदान करतात? की मग जातीच्या आधारावर? यावर परभणीचा बॉस कोण? हे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Mahadev Jankar - Sanjay Jadhav
Loksabha Election 2024 : धुळ्यात काँग्रेसची मोठी खेळी; सुभाष भामरेंविरोधात डॉ. शोभा बच्छाव रिंगणात..?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com